जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२२ । शहर वाहतूक शाखेने विना नंबर प्लेट वाहनांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाई अंतर्गत गेल्या दीड महिन्यात चाळीसगावात तब्बल ५२१ विना नंबर प्लेट वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. या दरम्यान शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी केलेल्या तपासणीत एक दुचाकीस्वार दुचाकी तेथेच सोडून पळून गेला. नंतर त्या गाडीच्या मालकाचा शोध घेतला असता ती दुचाकी चोरीची असल्याचे उघड झाले. मालेगाव पोलिसांत या चोरीप्रकरणी गुन्हाही दाखल आहेे. या धडक कारवाईने वाहनधारकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, चाळीसगावचे अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे व उपविभागीय पोलिस अधिकारी कैलास गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतुक शाखा चाळीसगाव यांनी २१ फेब्रुवारीपासून शहरात विना नंबर प्लेट वाहन तपासणी मोहीम हाती घेतली. त्यात आतापर्यंत केेलेल्या कारवाईत तब्बल ५२१ विना नंबर प्लेटची वाहने समोर आली. या विना क्रमांकाच्या वाहनांवर त्यांचा क्रमांक टाकून वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. |