महिनाभराने मुलगा घरी आला, दार उघडताच दिसला वडिलांचा मृतदेह
जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२२ । वडील रागावले असतील म्हणून फोन वर बोलत नयेत असे वाटणारा मुलगा घरी येतो आणि पाहतो तर काय तर वडिलांचा विचित्र मृतदेह. अशीच धक्कादायक घटना शनिवारी अमळनेरमध्ये उघडकीस अली.
पिंपळे रोडवरील सीताराम गजरे हे पिंपळनेर येथे नोकरीला होते. सध्या ते पिंपळे रोडवर राहायला आले होते. त्यांची पत्नी मुलाकडे पुण्याला राहत होती म्हणून ते एकटे घरात राहत होते. ते नातेवाईकांकडे जात असत. मुलाचे त्यांच्याशी ५ मार्चला बोलणे झाले होते. त्यांनतर मुलाने संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र वडील फोन उचलत नव्हते. बाहेरगावी गेलेले असतील, असे समजून त्यांनी काही दिवस संपर्क केला नाही
महिना उलटला तरी वडीलही फोन करत नाही; म्हणून अखेर मुलाने कुटुंबासह अमळनेर गाठले. तर घरात वडिलांचा मृतदेह पडलेला होता. मृतदेहामुळे परिसरात दुर्गंधी येत होती. पोलिस उपनिरीक्षक शत्रुघ्न पाटील व पोलिस कर्मचारी सुनील हटकर यांनी पंचनामा करून अमळनेर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.