भुसावळ

खळबळजनक : खडक्यात आग, एक लाख रूपये जळाले; हाेरपळून पारडू दगावले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० एप्रिल २०२२ । भुसावळ तालुक्यातील खडका येथील रहिवासी दीपक सुनील फालक यांच्या गोठा आणि गोठ्यात असलेल्या घराला शनिवारी दुपारी ३.३० वाजता आग लागली. त्यात शुक्रवारीच कांदा विक्रीचे प्राप्त झालेले एक लाख रूपये जळून राख झाले. तसेच म्हशीचे पारडू होरपळून मृत्युमुखी पडले. परिसरातील नागरिकांनी मदत केल्याने अन्य पशुधन वाचवता येणे शक्य झालेे.

अधिक माहिती अशी की, शनिवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास फालक यांचे घर आणि गोठ्याला आग लागली. वेगवान वाऱ्यामुळे ही आग सुध्दा सर्वत्र पसरली. दरम्यान, आगीच्या ज्वाळांमुळे गोठ्यात बांधलेल्या जनावरांची सुटण्यासाठी धडपड सुरू हाेती. हे चित्र पाहून परिसरातील नागरिकांनी धावपळ करत गुरांना साेडवले. मात्र, एक पारडू होरपळून दगावले. दरम्यान, शुक्रवारी विकलेल्या कांद्याचे एक लाख रूपये फालक यांना मिळाले होते. ही रक्कम घरात ठेवली होती. आगीत या रकमेसह संसाराेपयाेगी वस्तू जळून खाक झाल्या. खडक्यातील टँकरने आग विझवण्यास मदत केली.

Related Articles

Back to top button