⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | बातम्या | अमळनेरात विकत आणलेल्या लुटेरी दुल्हनचा पर्दाफाश

अमळनेरात विकत आणलेल्या लुटेरी दुल्हनचा पर्दाफाश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज। ९ एप्रिल २०२२ । दोन तरुणांशी विवाह करून लुबाडणाऱ्या मुलीसह तिच्या नाते वाईकांची बनवेगिरी अमळनेर येथील नवरदेवाच्या मित्रांनी उघडकीस आणून भंडाफोड केला आहे. अखेर दोन लाख रुपये परत घेऊन गुन्हा दाखल न करताच त्यांना सोडून देण्यात आले.

जळगाव येथील एका तरुणीचा तालुक्यातील एका तरुणाशी दि.६ रोजी विवाह संपन्न झाला. त्याच वेळी मध्यस्थी करणाऱ्या एका महिलेने दोन लाख रुपयांची मागणी करून पैसेही घेतले. इकडे तरुणाने विवाह होत नसल्याने गावात आणि आपल्या मित्रांना देखील मुलगी विकत आणून विवाह करत असल्याचे लपवून ठेवले होते. मात्र; मुलीकडील चारच नातेवाईक आले आणि तेही पैसे मागत असल्याने तरुणांच्या मित्रांना शंका आली. त्यांनी दोन तीन दिवसांपूर्वी फेसबुकची बातमी पाहिली होती. त्यात एका तरुणीने दि.२६ मार्च रोजी दौलताबाद येथील एका तरुणाशी विवाह करून लग्नानंतर फिरायला गेलेली असताना दागिने घेऊन ती मुलगी पळून गेल्याची बातमीचा व्हीडिओ पाहिला होता. त्यातील तरुणी आणि ही तरुणी एकच असल्याचे काही तरुणांनी पाहिले आणि घटना उघडकीस आणली. त्यानंतर गावकऱ्यांनी नवरी मुलगी आणि तिचे नातेवाईक याना थांबवून ठेवले. आपला गुन्हा उघडकीस आल्याचे समजताच तरुणीने कबुली दिली. यावेळी नवरदेवाच्या पालकांनी दिलेले दोन लाख रुपये परत घेऊन त्यांना सोडून देण्यात आले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह