⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबीर

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबीर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । जागतिक आरोग्य दिनानिमित्‍त गुरुवार दिनांक ७ एप्रिल रोजी रोटरॅक्ट क्लब ऑफ गोदावरी आणि गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च यांच्या संयुक्त विद्यमाने गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.

याप्रसंगी गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी आरोग्य दिनाचे महत्व सांगितले. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे, आरोग्य चांगले असेल तर कामात कसलीही अडचण येणार नाही. कोणत्याही आजाराकडे दुर्लक्ष न करता वेळोवेळी आपण डॉक्टरांकडून तपासणी केली पाहिजे जेणेकरून आजारावर मात करता येईल. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या आहाराकडे दुर्लक्ष होत आहे. फास्ट फूड, बेकरी पदार्थ इत्यादींचे खाण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते यांच्या सेवनाने पोटाच्या समस्या वाढतात यासाठी संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. फळं, पालेभाज्यांचा जास्त समावेश आपल्या आहारात करायला हवा ज्यामुळे शरीराला योग्य त्या जीवनसत्त्वांचा लाभ मिळेल व शरीराचे कार्य सुरळीत चालू राहील, असेही त्यांनी सांगितले.
आरोग्य दिनाचे औचित्य साधून मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले.

यावेळी महाविद्यालयातील एमबीए, बीबीए, बीसीएचे विद्यार्थी तसेच फिजीओथेरपी, नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी या शिबिराचा लाभ घेतला. सदर तपासणी साठी डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉ.जीवक काकडे, डॉ. क्षितिज इसासरे, डॉ. अमन अग्रवाल यांच्या समवेत नर्स शुभांगी पनमंद, अश्विनी नेरे उपस्थित होते. यावेळी रुग्णालयाचे पीआरओ मकरंद महाजन हे उपस्थीत होते.

यावेळी महाविद्यालयातील डॉ. नीलिमा वारके, प्रा. मकरंद गोडबोले, प्रा. प्राजक्ता पाटील, प्रा. चेतन सरोदे, डॉ. अनुभूती शिंदे, प्रा. भाग्यश्री पाटील, प्रा. आफ्रिन खान, प्रा. अश्विनी सोनवणे, प्रा. श्रुतिका नेवे, प्रा. मिताली शिंदे, प्रा. प्रिया फालक, प्रा. चंद्रकांत डोंगरे, प्रा. दिपक दांडगे, मयुर पाटील, गौरव पाटील, सागर चौधरी, गणेश सरोदे, प्रशांत किरंगे, जीवन पाटील, प्रफुल्ल भोळे, रुपेश पाटील, घनश्याम पाटील, रुपेश तायडे, जयश्री चौधरी, भावना ठाकूर आदि कर्मचारी उपस्थित होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.