जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२२ । मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना माजी महसूल कृषी मंत्री एकनाथराव खडसे अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांनी गिफ्ट दिले आहे. मुक्ताईनगर मतदारसंघातील विविध गावात विकास कामे करण्यासाठी एक कोटी पाच लाखांचा निधी मंजूर केला आहे.
मुक्ताईनगर मतदारसंघातील विविध गावातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांमध्ये विविध विकासकामे करण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे माजी महसूल कृषी मंत्री एकनाथराव खडसे अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांनी विकास निधीची मागणी केली होती. या अनुषंगाने मुंडे यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत मुक्ताईनगर मतदारसंघातील विविध गावात विकास कामे करण्यासाठी एक कोटी पाच लाखांचा निधी मंजूर केला आहे.
मंजूर निधीतून लुमखेडा, ता.रावेर येथे मागासवर्गीय वस्तीत सभागृह बांधकाम करणे (15 लाख), चिंचखेडा बु.॥, ता.मुक्ताईनगर येथे वायला मागासवर्गीय वस्तीकडे जाणारा रस्ता मजबुतीकरण करणे (15 लाख), निमखेडी खुर्द येथे ठेलारी वस्तीकडे जाणारा रस्ता मजबुतीकरण करणे (15 लाख), लोणवाडी, ता.बोदवड येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये सामाजिक सभागृहाचे बांधकाम करणे. (15 लाख), साळसिंगी, ता.बोदवड येथे मागासवर्गीय वस्तीत रस्ता काँक्रिटीकरण करणे (पाच लाख), साळसिंगी, ता.बोदवड येथे मागासवर्गीय वस्तीत गटार बांधकाम करणे (पाच लाख), करंजी, ता.बोदवड येथे मागासवर्गीय वस्तीत गटार बांधकाम करणे (पाच लाख), करंजी, ता. बोदवड येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये रस्ता काँक्रिटीकरण करणे (पाच लाख), पळासखेडा, ता.बोदवड येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये रस्ता कॉक्रिटीकरण करणे (पाच लाख), पळासखेडा, ता.बोदवड येथे मागासवर्गीय वस्तीत गटार करणे (पाच लाख), जामठी, ता.बोदवड येथे मागासवर्गीय वस्तीत गटार करणे (पाच लाख), जामठी, ता.बोदवड येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये रस्ता काँक्रिटीकरण करणे (पाच लाख), शेलवड, ता.बोदवड येथे मागासवर्गीय वस्तीमध्ये गटार करणे (पाच लाख) ही कामे मंजूर झाली आहेत.