जळगाव लाईव्ह न्यूज। ७ एप्रिल २०२२ । माहेरून पैसे आणावे म्हणून विवाहितेला शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना समोर आला आहे. याप्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून संशयितांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील जोशी वाडा येथील माहेर असलेल्या रेहानाबह कुरबान खान (वय-२५) यांचा विवाह जळगावातीलच आझाद नगर, पिंप्राळा येथील कुरबान खान इस्माईल खान याच्यासोबत रितीरिवाजानुसार झाला. पती कुरबान खान याने विवाहितेला माहेरहून पैसे आणावे यासाठी तगादा लावला. परंतु माहेरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे विवाहितेने माहेरून पैसे आनले नाही. त्याचा राग मनात धरून पती कुरबान खान याने विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरवात केली. त्यानंतर सासू, सासरे दिन आणि नणंद यांनी देखील विवाहितेकडे पैशांचा तगादा लावला. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. दरम्यान ६ एप्रिल रोजी विवाहितेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पती कुरबान खान इस्माइल खान, सासु फरिदा खान इस्माईल खान, सासरे इस्माईल खान, दीर शेर खान इस्माईल खान, सुभान खान इस्माईल खान आणि सुलतानाबी हसन खान सर्व रा. आजाद नगर, पिंप्राळा यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय धनगर करीत आहे.