लाेकाे पायलट प्रकरण : भुसावळात तब्बल २०० लाेकाे पायलट्सची तीव्र निदर्शने
जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२२ । लाल सिग्नल पास झाल्याने रेल्वे प्रशासनाने तीन लाेकाे पायलट यांना थेट कार्यमुक्त केले. या मनमानीचा निषेध म्हणून सुमारे २०० लाेकाे पायलटांनी मंगळवारी येथील डीआरएम कार्यालयाबाहेर घाेेषणाबाजी केली. चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिला.
यावेळी सीआरएमएसचे मंडळ अध्यक्ष व्हीे.के. समाधिया, एस.बी. पाटील, ए.के.तिवारी, के.पी, चाैधरी, अजय मालवीय, आर.के. मेघराज, प्रवीण पाटील, किशोर काेलते, ललित मुथा आदी उपस्थित हाेते. सर्वांनी डीएआरच्या प्रकरणात रेल्वे बाेर्डाने तयार केलेल्या नियमावलीचे पालन करावे, मेमू गाडीत सहायक लोको पायलटची ड्युटी लावावी, वाढलेल्या गाड्यामुळे नवीन भरली जावी, रनिंग स्टाॅफच्या रिक्त जागा भराव्या, मालगाडीवरील स्टाॅफला मुख्यालयातून थ्रू चालवणे बंद करावे, खंडवा येथील रनिंग रूमध्ये नवीन बेडची व्यवस्था, रनिंग रूममधील जेवणाची गुणवत्ता सुधारावी, अशी मागणी केली.