⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | …अन्यथा १२ हजार कोटींचे औष्णिक विद्युत प्रकल्प बंद पडेल

…अन्यथा १२ हजार कोटींचे औष्णिक विद्युत प्रकल्प बंद पडेल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ एप्रिल २०२१ । सध्यातरी पूर्ण देशात महामार्ग चौपदरीकरणाचे कामकाज वेगाने सुरु आहे. यात पूर्वनियोजित कामांतील काही त्रुटीही निदर्शनास येत आहेत. याच अनुषंगाने फुलगाव येथील चौपदरी करण होत असलेल्या महामार्गावर ओझरखेडा येथील धरणामधून औष्णिक विद्युत प्रकल्पला पाणीपुरवठा करणारी १६०० एमएम व्यासाची पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे. 

 

जवळपास १२ हजार कोटींच्या औष्णिक विद्युत प्रकल्पाला पाणी पुरवठा करण्यासाठी येथील पाईपलाईन उपयोगात येत आहे. सदर पाईपलाईन असलेल्या ठिकाणी महामार्ग चौपदरीकरण निर्मितीचे कामकाज सुरु आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर भवष्यातील पाईपलाईन गळती व दुरुस्तीसाठी कुठलेही नियोजन तापी महामंडळ अथवा महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात आलेली नाही. याच संदर्भात नागरिकांच्या तक्रारीनंतर खासदार रक्षाताई खडसे यांनी समक्ष पाहणी करून आढावा घेतला 

 

जिल्ह्यात पाण्याची पाईपलाईन गळतीच्या समस्या सर्वश्रुत आहेत. तसेच जीवनाचा अत्यावश्यक भाग हे पाणी आहे त्यामुळे पाण्याचे मूल्य हे सर्वसामान्यांना बहू परिचित आहे. चांगले रस्ते व महामार्ग शहरात व गाव खेड्यात उपलब्ध होण्याकडे प्रत्येक जनसामान्यांचे डोळे एकवटलेली आहेत. परंतु नियोजित महामार्ग निर्माण केला जात असतांना भविष्यकालीन दृष्टिकोनही आत्मसात करणे आवश्यक आहे. या भागातून औष्णिक विद्युत प्रकल्पाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या गळती व दुरुस्तीसाठी नियोजन तापी महामंडळ आणि महामार्ग प्राधिकरणाकडून करण्यात यावे. तसेच भविष्यकालीन दृष्टीने विचार केल्यास सदर पाईपलाईन गळती झाल्यास अथवा फुटल्यास मोठे नुकसान महार्गाचे आणि औष्णिक विद्युत प्रकल्पाचे होऊ शकते हे नुकसान टाळण्यासाठी तापी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी विचारणा केली असता त्यांना उडवा उडवीची उत्तरे अधिकारी देत आहेत. त्यामुळे नागरिकांनी लोकप्रतिनिधी खासदार रक्षाताई खडसे यांना पाचारण करून सदर कामात लक्ष देण्याची विनंती केली. त्यामुळे आज या भागात खासदारांनी समक्ष भेट देऊन महामार्गाची आणि तापी महामंडळाच्या ढोबळ कामकाजाचा जातीने आढावा घेतला.

 

भविष्यकालीन धोका लक्षात घेऊन सदर पाईपलाईन फुटून दळण-वळणाची सुविधा अथवा औष्णिक विद्युत प्रकल्प बंद पडू शकतो या घटना घडू नयेत यासाठी नियोजन करण्यात यावे अशी मागणी भागातील नागरिकांची आहे. त्यामुळे पाईपलाईनची दुरावस्था झाल्यास या ठिकाणी दुरुस्तीसाठी स्वतंत्र पूल बनविण्याची आवश्यकता आहे. किंवा भोगावती नदीवर तयार असलेल्या पुलाखालून ही पाईपलाईन टाकल्यास ती नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतातून न नेता महामार्गला लागून समांतर पुढे नेण्यात यावी अशी त्या भागातील शेतकऱ्यांची मागणी आहे. सदर भागातील शेतकऱ्यांचे, औष्णिक प्रकल्पाचे आणि चौपदरी महार्गाचे निर्दोष आणि नियोजनबद्ध कामकाज विनाअडथळा पूर्ण करण्याबाबत आणि नागरिकांच्या हितार्थ भविष्यकालीन दृष्टिकोनातून संभावित घटनांच्या अनुषंगाने दर्जेदार कामकाज करावे असे खासदार रक्षाताई खडसे यांनी प्रांताधिकाऱ्यांना निर्देश दिले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.