जळगाव लाईव्ह न्युज | ५ एप्रिल २०२२ । गेल्या अडीच वर्षापासून सुरू असलेल्या जळगाव शहरातील नागरिकांच्या वनवासाला अखेर पूर्णविराम लागायला सुरुवात होणार आहे. कारण येत्या दोन दिवसांमध्ये जळगाव शहरातील मुख्य रस्त्यांच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती मनपातील विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
जळगावात गेल्या दोन वर्षापासून अमृत योजनेचे व भुयारी गटारी चे काम सुरू आहे. यामुळे लहान-सहान रस्त्याने पासून ते मोठ्या रस्त्याने पर्यंत सर्वच रस्ते मनपातर्फे खोदण्यात आले आहेत. यामुळे सर्वसामान्य जळगावकरांचे हाल होत आहेत. अखेर जळगाव शहर वासियांना खुशखबर मिळणार असून गेल्या अडीच वर्षापासून सुरु असलेल्या वनवासाच्या सांगतेला लवकरच सुरुवात होणार आहे.
कारण येत्या दोन दिवसात जळगाव शहरातील मुख्य रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच 42 कोटींच्या कामाच्या निवेदनावर स्वाक्षरी केल्याने जळगाव शहरातील मुख्य रस्त्यांचा मार्ग आता मोकळा झाला आहे. आता लवकरच या कामांना सुरुवात होणार आहे