⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | न्हाळी परिक्षेकरिता ऑफलाइन व ऑनलाईन दोन्ही पर्याय उपलब्ध करून द्यावे- म.स्टु.यु

न्हाळी परिक्षेकरिता ऑफलाइन व ऑनलाईन दोन्ही पर्याय उपलब्ध करून द्यावे- म.स्टु.यु

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२२ । विद्यार्थींना उन्हाळी परिक्षेकरिता ऑफलाइन व ऑनलाईन दोन्ही पर्याय उपलब्ध करून द्यावे या मागणीसाठी मंगळवारी महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासु) या अराजकीय विद्यार्थी संघटनेच्यावतीनं निवेदन देण्यात आले. यावेळी
उत्तर महाराष्ट्र सहसचिव दिपक सपकाळे, जिल्हाध्यक्ष रोहन महाजन, जिल्हा सचिव रोहित काळे, अतुल उबाळे, सुकलाल सुरवाडे, संदिप बोरसे आदि उपस्थित होते.
दरम्यान, निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन (मासु) या अराजकीय विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर विद्यार्थ्याच्या हक्क आणि अधिकारांच्या पूर्ततेसाठी न्यायिक स्वरुपाचा लढा देण्याचं कार्य करीत आहे. यामुळै आपल्या अधिकार क्षेत्रात येणारी विद्यापीठ प्रशाळा तसेच विद्यापीठांंशी संलग्नीत सर्व महाविद्यालयाचे येणारी हिवाळी परीक्षा ही आँनलाइन आणि आँफलाइन या दोन्ही पर्याय विद्यार्थ्यांना देण्याची मागणी संघटनेच्यावतीने लावून धरण्यात आली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पाश्वभूमीवर राज्य आणि केंद्र सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लादलेल्या निर्बधामुळे महाविद्यालयीन शिक्षण हे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आणि सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशामुळे आँनलाइन पद्धतीने चालु होते आणि चालु आहे.
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे राज्यात 20 आँक्टोबर पासुन आँफलाइन पद्धतीने महाविद्यालय सुरु केले ही मागणी आमचीच होती. या निर्णयाच आम्ही स्वागत सुद्धा केले होते मात्र त्यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी असं म्हटलं होते की ज्या विद्यार्थ्याचे दोन डोस पुर्ण झालेले आहेत अशाच विद्यार्थ्यांना महाविद्यालय प्रवेश मिळणार ज्या विद्यार्थ्याचे लसीकरण झाले नाही अशा विद्यार्थ्यासाठी आँनलाइन पद्धतीने शिक्षण सुरु ठेवलेले आहे.
त्यामुळे आमची मागणी आहे की उन्हाळी सत्राच्या परीक्षा ह्या आँनलाइन व आँंफलाइन या दोन्ही पद्धतीने घेण्यात याव्यात.सध्याचे शैक्षणिक सत्र आपण आँनलाइन पद्धतीनेच सुरु केले होते 1 फेब्रुवारी ते 05 एप्रिल पर्यत 55% ते 60% अभ्यासक्रम हे आँनलाइनच शिकवून पूर्ण झालेले आहे.
सध्या महाराष्ट्रांत सुरु असलेल्या एस.टी.कामगारांचा संप, रेल्वेने प्रवास बंद जर दळणवळणाची मुख्य व्यवस्थाच बंद आहे तर मग विद्यार्थी आँनलाइन शिकवून आँफलाइन परीक्षेसाठी कसे पोहचणार याचा विचार प्रशासनाने केला नाही. विद्यापीठ स्तरावर केला जात आहे.
आमचा आँफलाइन शिक्षणाला विरोध नाही मुळात आमची ही सुरवातीपासूनचीच मागणी राहीलेली आहे की शिक्षण ऑफलाईन सुरु करा म्हणूनच पुढील शैक्षणिक वर्षाचे सत्राच्या परीक्षा व तासिका आँफलाइन पद्धतीने घेण्यात यावे त्यासाठी विद्यार्थ्यांना मानसिक दृष्टया स्वत:ला तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल व त्यासाठी आपण विद्यार्थ्यांना आगाऊ माहिती देऊ शकता.
राज्यामधे 11 अकृषी विद्यापीठ आहे. त्यातून मुंबई विद्यापीठ व राज्यातील काही स्वायत्त महाविद्यालय उन्हाळी परीक्षा आँनलाइन पद्धतीने घेणार आहेत जर मुंबई विद्यापीठ व राज्यातील काही स्वायत्त महाविद्यालये विद्यार्थी हिताचा निर्णय घेऊ शकतात तर आपण का नाही ?
असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित करण्यात येत आहे. कोरोनाच्या काळात विद्यार्थी खुप त्रस्त होते अजूनही आहेत तरी आपण येणारी उन्हाळी परीक्षा विद्यार्थ्यांना आँनलाइन व आँफलाइन दोन्ही पर्याय उपलब्ध करुन द्यावेत हीच आमची माफक अपेक्षा अन्यथा आम्हाला लोकशाही अधिकारांचा वापर करून विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपल्या विद्यापीठात आंदोलन उभरावे लागेल याची नोंद घ्यावी असा इशाराही संघटनेमार्फत निवेदनातुन देण्यात आला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.