जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२२ । महिला प्रवासी संशयास्पद वाहनाने मध्यप्रदेशकडून चोपडाकडे येत असल्याचे येथील पोलिसांना गोपिनीय माहिती मिळाली त्यानुसार चापडा रचून तपासणी केली असता. त्यात तब्बल साडेपाच किलो गांजा आढळून आला. महिलेसह गांजा जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक अवतरसिंग चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, बोरअजंटी नाक्यावर सापळा रचून संशयित रंजना गंगाधर तिळके (वय ४०, रा.गुळी हतनूर, तेलंगणा) हिला पोलिसांनी ताब्यात घेतले महिलेकडे. एक लाख दहा हजार रुपये किमतीचा साडेपाच किलो गांजा आढळला. तेलंगणा राज्यातील महिला प्रवासी वाहनाने मध्यप्रदेशकडून चोपड्या कडे येत होती. पोलिसांना गुफ्त माहिती मिळाल्याने, सापळा रचून पोलिस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे, अमंलदार विनोद पाटील, कॉन्स्टेबल रितेश चौधरी, नीता राजपूत यांनी महिलेस ताब्यात घेतले. महिलेकडून गांजा जप्त केला. पुढील तपास पीएसआय अमरसिंग वसावे करत आहेत.