जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२२ । आयएमए जळगावच्या सभागृहात २०२१-२२ या वर्षांची संस्थेची सर्व साधारणसभा अध्यक्ष डॉ.सी.जी.चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. यावेळी सचिव डॉ.राधेश्याम चौधरी यांनी वर्षभरातील कामकाजाचा लेखाजोखा मांडला. तसेच वर्षभरातील संस्थेचा जमा खर्च, ॲाडीट त्यांनी सादर केले.
कोरोनामुळे समाज संकटात, संभ्रमात, निराशेच्या चक्रात गुंतलेला असताना आपल्या सदस्य तज्ञांच्याद्वारे वैद्यकिय माहिती सोशल मिडीयाद्वारे देत समाजाच मनोबल वाढवणारी, समाजाला मानसिक आधार, सकारात्मकता देणारी चर्चासत्रे आपण आयोजित केलीत. विक्रमी ६१ रक्तदात्यांच्या सहभागाने रक्तदान शिबीर यशस्वी ठरले. कोरोनाच्या काळातील शासकिय निर्बंधांमुळे कुठतरी आपल्या सामाजिक जीवनावर, उत्सवांवर टाच, मर्यादा आल्या होत्या. प्रतिबंधात्मक सुचनांच पालन करित आपण आपल्या सदस्य व कुटुंबीयांचे एकत्रीकरण गणेशोत्सव, नवरात्री, बॅाक्स क्रिकेट या निमित्ताने करण्यात घडवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. फायर टॅक्सचा अवाजवी कराचा अनेक वर्षे प्रलंबित प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यात आपल्याला यश मिळाले.
संघटनेचा राज्यस्तरीय, राष्ट्रीय अजेंडा राबवत असताना सदस्यांच्या स्थानिक समस्या, व्यावसायीक गरजा(CMEs), प्रशासनाशी समन्वय, समाजातील सर्व घटकांशी सुसंवाद या सर्व आघाड्यांवर आयएमए जळगावचा आलेख उंचावण्यासाठी जाणीवपूर्वक, परिश्रमपूर्वक, प्रामाणिकपणे सर्व टिमने डॉ.सी.जी.चौधरी यांच्या मार्गदर्शनात वर्षभर केला असेही डॉ.चौधरी यांनी यावेळी नमुद केले.
दरम्यान पुढील कार्यकाळासाठी निवडणूक प्रक्रियेद्वारे निवडलेल्या नविन कार्यकारी मंडळाला या सभेत एकमताने मंजूरी देण्यात आली. पुढील कार्यकाळासाठी अध्यक्षपदी डॉ. दिपक आठवले, उपाध्यक्षपदी डॉ. सुनिल नाहाटा, सचिवपदी डॅा जितेंद्र कोल्हे यांची निवड करण्यात आली. या प्रसंगी डॉ.सी.जी.चौधरी, डॉ. आठवले, डॅा. अनिल पाटील, डॅा सिकची, डॅा.राजेश पाटील, डॅा.स्नेहल फेगडे आदिंनी डॅा. राधेश्याम चौधरी यांच्या कामगिरीबद्दल गौरवोद्गार काढले. सुत्र संचालन खजिनदार डॅा.भरत बोरोले यांनी केले.
आयएमए वार्षिक सर्व साधारण सभेला
मागील प्रोसीडींग वाचून कायम करणे.
२०२१-२२ या आर्थिक वर्षांच्या कामकाजाचा आढावा घेवून या वर्षाच्या जमा खर्चास मान्यता देणे.
आयएमए च्या संविधान/घटनेत कामकाज अधिक सुसह्य,सुरळीत करण्यासाठी सुधारणा करण्याबाबत.
२०२२-२७ या कालावधीसाठी नविन पदाधिकारी,कार्यकारी मंडळ याची निवड करणे.
आयएमए जळगाव च्या पदाधिकारी व कार्यकारी मंडळाचा कालावधी ५ वर्षाऐवजी ३ वर्ष करणेबाबत चर्चा करणे.
अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळी येणार्या विषयावर चर्चा करणे.