Court News : गतिमंद चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला मरेपर्यंत जन्मठेप

मार्च 30, 2022 5:21 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२२ । जळगाव शहरापासून जवळच असलेल्या पाळधी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नोव्हेंबर २०२० मध्ये एका नराधमाने भरदिवश घरात घुसून ८ वर्षीय गतिमंद चिमुकलीवर अत्याचार केला होता. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल होऊन संशयिताला अटक करण्यात आली होती. न्यायालयात याप्रकरणी कामकाज झाले असता सत्र न्यायालयाचे न्या.डी.एन.खडसे यांनी ९ साक्षीदार तपासल्यानंतर आरोपीला दोषी ठरविले. अत्याचार प्रकरणी आरोपीला नैसर्गिक मृत्यू येईपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून पीडितेला ६ हजार रुपये दंडाची रक्कम देण्याचे आदेश सुनावण्यात आले आहे.

court order jpg webp

पाळधी दूरक्षेत्र पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका ८ वर्षीय गतिमंद चिमुकलीला घरात बोलावून दि.२४ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी १०.३० ते ११.३० वाजेच्या आरोपी रमेश मंगा कळस्कर याने दरवाजा आतुन बंद करुन अतिप्रसंग केला होता. याप्रकरणी पाळधी दुरक्षेत्र येथे आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने पोलीसांनी गु.र. क. २३७ / २०२०, भा.द.वि. कलम ३७६(२) (जे) (एल). ३४२ आणि बा.लै.अ.प्र.अधिनियम २०१२ चे कलम ४, ६, ८, १२ नुसार तक्रार नोंदविली. खटल्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयाचे सत्र न्यायाधीश डी. एन. खडसे सो. यांच्या न्यायालयासमोर झाली. त्यात सहा. शासकिय अभियोक्ता निलेश चौधरी यांनी एकूण ९ साक्षीदार तपासले. यात फिर्यादी, पिडीतेचे वडील, पिडीता स्वतः पंच साक्षीदारांची साक्ष तपासी अंमलदार व डॉक्टर यांची साक्षी महत्वपूर्ण ठरली.

खटल्याकामी पिडीता ही ८ वर्षाची मतीमंद असल्याने तिची साक्ष नोंदविण्यासाठी गुजराती मुक बधीर विद्यालय, धरणगांव येथील नियुक्तीचे विशेष शिक्षक यांच्या मदतीने सांकेतिक भोषेद्वारे, इशा-याद्वारे, खाणाखुणा करुन नोंदविण्यात आलेली आहे. तसेच सदर खटल्याकामी घटना घडल्यानंतर पिडीता ही घाबरलेल्या अवस्थेत रडत आरोपीच्या घरातून बाहेर पडतांना पाहीलेल्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. तसेच सदर कामातील तपासी अधिकारी यांनी योग्य प्रकारे काम केल्यामुळे तसेच सरकारपक्षातर्फे करण्यात आलेला प्रभावी युक्तीवाद मे. न्यायालयाने ग्राहय धरत आरोपीस भा.दं.वि. कलम ३७६ (२) (जे) (एल) व ३४१ आणि बा.लै.अ.प्र. अधिनियम २०१२ चे कलम ३अ व ५ अन्वये दोषी धरुन शिक्षा ठोठावली.

खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता निलेश द. चौधरी यांनी साक्षीदारांच्या साक्षी नोंदवून प्रभावी युक्तिवाद केला. तसेच ८ वर्ष वयाच्या लहानग्या मतीमंद मुलीसोबत केलेले कृत्य हे समाजात नात्यांच्या व माणुसकीच्या छबीला काळीमा फासणारे आहे असाही युक्तिवाद केला. न्यायालयासमोर आलेले पुरावे व प्रभावी युक्तिवाद यामुळे न्यायालयाने आरोपी यास दोषी धरले आहे. याकामी पैरवी अधिकारी देविदास कोळी तसेच केस वॉच विलास पाटील यांनी सहकार्य केले.

असे कलम, अशी शिक्षा
१. भा.द.वि. कलम ३७६ (२) (जे) (एल) खाली नैसर्गिक मृत्यूयेईपर्यंत कारावासाची शिक्षा व रुपये २,०००/- दंड, दंड न भरल्यास १ महीन्याची साधी कैद.
२. भा.द.वि. कलम ३४२ खाली एक वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा व रुपये १,०००/- दंड व दंड न भरल्यास एक महीन्याची साधी कैद.
३. बा लै.अ.प्र. अधिनियम २०१२ चे कलम ४ खाली ७ वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा व रुपये १,०००/- दंड व दंड न भरल्यास १ महीन्याची साधी कैद.
४. बा.लै.अ.प्र. अधिनियम २०१२ चे कलम ६ खाली १० वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा व रुपये २,०००/- दंड व दंड न भरल्यास १ महीन्याची साधी कैद. असे शिक्षेचे स्वरूप आहे.

चेतन वाणी

पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now