जळगाव जिल्हाजळगाव शहर
शस्त्रक्रियासाठी निवड झालेले रुग्ण आज गोदावरी रुग्णालयात दाखल
जळगाव लाईव्ह न्यूज । अमीर पटेल । यावल तालुक्यातील कोरपावली येथे दि.२४ रोजी गोदावरी फौंडेशनच्या वतीने आयोजित भव्य नि:शुल्क महाआरोग्य शिबीर घेण्यात आले होते. त्यात शस्त्रक्क्रियेसाठी निवड झालेल्या रुग्णाची आज येथून गोदावरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याकामी रवानगी करण्यात आली.
या प्रसंगी माजी सरपंच तसेच काँग्रेस सेवा फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील पटेल, भरत चौधरी, अजय बढे, नितीन पाटील उपस्थित होते. यावेळी रुग्णांनी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील आणि जलील पटेल, सरपंच विलास अडकमोल, उपसरपंच मुक्तार पटेल, उमेश जावळे आदींचे आभार मानले.