⁠ 
शुक्रवार, सप्टेंबर 20, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | शिरसोली येथील आरोग्य केंद्रासाठी ४ कोटींचा निधी : ना.गुलाबराव पाटील

शिरसोली येथील आरोग्य केंद्रासाठी ४ कोटींचा निधी : ना.गुलाबराव पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मार्च २०२२ । शिरसोली प्र.न.येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामासाठी ४ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात येणार असून याचे काम लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केली. शिरसोली येथे पिंजारी बिरादरी अल्पसंख्यांक बहुउद्देशीय संस्था व युवा फाऊंडेशनच्या वतीने आयोजीत कार्यक्रमात ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पिंजारी समाज मंगल कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले.

याप्रसंगी पालकमंत्र्यांनी गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली. तसेच परिसरातील नागरिकांच्या विजेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी लवकरच वीज उपकेंद्र (सबस्टेशन) देखील उभारण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी शिरसोली येथे पिंजारी समाज मंगल कार्यालयासाठी मूलभुत सुविधा २५-१५ योजनेच्या अंतर्गत निधी प्रदान केला होता. या कार्यालयाचे आज लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ना. गुलाबराव पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून पं. स. माजी सभापती नंदलाल पाटील, सामाजिक कार्यकर्ते उमाजी पानगडे, मुस्ताक पिंजारी, रईस मेंम्बर, उपजिल्हा संघटक नरेंद्र सोनवणे, संजय गांधी निराधार समितीचे सदस्य अर्जुन पाटील, अल्पसंख्याक सेनेचे अखिल मेंम्बर, सरपंच प्रदीप पाटील, उपसरपंच विनोद बारी,माजी उपसभापती मुरलीधर ढेंगळे, माजी सरपंच अनिल पाटील, रामकृष्ण काटोले, श्रावण ताडे, शाळेचे चेअरमन प्रवीण पाटील, सादिक पिंजारी, अबू खाटीक, सुनिल पाटील आदी उपस्थित होते.

प्रारंभी पिंजारी बिरादरी अल्पसंख्यांक संस्था आणि युवा फाऊंडेशनच्या वतीने ना. गुलाबराव पाटील यांचे भव्य स्वागत करण्यात आले. समाजासाठी भव्य हॉलची निर्मिती करून दिल्याबद्दल पालकमंत्र्यांचा याप्रसंगी यथोचित सत्कार करण्यात आला.

पिंजारी समाज मंगल कार्यालयाचे लोकार्पण केल्यानंतर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, मी शब्द दिल्यानुसार हॉल तयार झाला असून हॉलच्या समोर ६ लाख रूपयांचे पेव्हिंग ब्लॉक बसविण्यात येतील असे ते म्हणाले. शिरसोलीसह परिसरातील नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी शिरसोली प्र. न. येथे ४ कोटी रूपयांच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी मिळाली असून याचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती ना. पाटील यांनी दिली. तर, येथील पाणी पुरवठा योजनेच्या मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात आले असून यालाही लवकरच गती मिळणार असल्याची ग्वाही दिली. तसेच अलीकडेच चिंचोली येथे वीज उपकेंद्राचे काम सुरू करण्यात आले असून याचप्रमाणे शिरसोली परिसरातील नागरिकांच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी वीज उपकेंद्र (सबस्टेशन) उभारण्यात येणार असून याच्या निधीसाठी कोणतीही कमतरता पडू देणार नसल्याचे ना. गुलाबराव पाटील म्हणाले.

कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सचिन पाटील सर यांनी केले तर आभार मुस्ताक पिंजारी यांनी मानले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह