⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | गुन्हे | महामार्गावर भीषण अपघात : दोन चुलत भावांचा मृत्यू, एकाचे महिनाभरापूर्वीच झाले होते लग्न

महामार्गावर भीषण अपघात : दोन चुलत भावांचा मृत्यू, एकाचे महिनाभरापूर्वीच झाले होते लग्न

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२२ । जळगाव शहाराकडून भुसावळकडे जाणाऱ्या रस्त्यावर दूरदर्शन टॉवरजवळ अपघातात जळगावातील दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी घडली. अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. दरम्यान, अपघातात मयत झालेल्या एका तरुणाचा गेल्याच महिन्यात विवाह झाला होता.

जळगाव शहरातील लक्ष्मीनगरात राहणारा परवेज निसार खाटीक (वय २२) आणि आमीर जाकीर खाटीक (वय २२, रा.उस्मानिया पार्क ) हे दोघे चुलत भाऊ आहे. परवेज हा भाजीपाला विक्री करून कुटुंबाला हातभार लावत होता. गेल्या महिन्यातच त्याचा विवाह झाला होता. पत्नी माहेरी गेली असल्याने परवेज हा चुलत भाऊ आमीरसोबत पत्नीला भेटण्यासाठी बुऱ्हाणपूर येथे गेला होता.

भेट घेतल्यानंतर दोघे दुचाकी क्रमांक एमएच.१९.सीएच.६०५९ ने घरी परतत होते. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास दूरदर्शन टॉवरच्या समोरच्या अरूंद रोडवर त्यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात परवेज हा जागीच ठार झाला. तर, गंभीर जखमी झालेल्या आमीर याला जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार घेत असतांना त्याने शेवटचा श्‍वास घेतला.

अपघाताची माहिती कळताच नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत एकच आक्रोश केला होता. दुचाकीला टँकरने धडक दिली असल्याची माहिती समोर आली आहे. परवेज भाजीपाला विक्री करून तर आमीर गॅरेज काम करून कुटुंबाला हातभार लावत होता. कुटुंबातील दोन्ही कर्ते पुरुष गेल्याने हळहळ व्यक्त होत होती.

author avatar
चेतन वाणी
पत्रकारिता क्षेत्रात गत ११ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट.