गुन्हेमहाराष्ट्र

औरंगाबाद- जळगाव महामार्गावर बर्निंग बसचा थरार!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२२ । पुणे येथून मलकापूरला २८ प्रवासी घेऊन जाणाऱ्या एका खासगी लक्झरी अचानक पेट घेतला. ही घटना आज पहाटे औरंगाबाद जिल्ह्यातील जळगाव महामार्गावरील अजिठा रोडवर घडलीय. मात्र, चालकाने वेळीच प्रसंगावधान दाखवल्याने सर्व प्रवासी सुखरूप आहेत. या भीषण अपघातामध्ये कोणतेही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साई ट्रॅव्हल्सची लक्झरी बस (MH12.EQ.9007) पुण्यावरून मलकापूरकडे २८ प्रवासी घेऊन जात होती. दरम्यान, सकाळी पहाटे पाच वाजता औरंगाबाद- जळगाव महामार्गावरील अजिंठा रोडवरील भारत दर्शनजवळ या धावत्या बसने अचानक पेट घेतला. बसला अचानक आग लागताच एकच गोंधळ उडाला, पण याचवेळी बसचालक संतीष गई यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. तर घटनेची माहिती मिळताच अजिंठा पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

सुरुवातीला लक्झरी बसच्या एका चालकाने पेट घेतला होता. मात्र, त्यांनतर आग वाढत गेली. बसने पेट घेतल्याचे बसचालक संतीष गई यांच्या लक्षात आहे. त्यामुळे त्यांनी बस जागेवरच थांबवली. त्यांनतर बसमध्ये बसलेल्या सर्व प्रवाशांना बसमधून उतरवलं. प्रवासी खाली उतरताच आगीचा भडका उडाला आणि पाहता-पाहता बस जळून खाक झाली. पण बसचालक संतीष गई यांनी वेळीच प्रसंगावधान दाखवले नसते तर मोठी दुर्घटना घडली असती आणि चित्र काही वेगळंच असतं.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button