जळगाव लाईव्ह न्यूज । २३ मार्च २०२२ । जळगाव तालुक्यातील एका गावातील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
काय आहे प्रकार?
जळगाव तालुक्यातील एका गावात सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या नातेवाइकांकडे आली होती. यादरम्यान अज्ञात व्यक्तीने तिला फुस लावून पळवून नेले. अशी तक्रार अल्पवयीन मुलीच्या नातेवाईकांनी तालुका पोलिसात दिली असून त्यावरून अज्ञात व्यक्तीविरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश सायकर करीत आहेत.