⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | वाणिज्य | ‘या’ स्टॉकने दिला घसघशीत परतावा, 5 महिन्यांत 10 हजारांचे झाले 1.37 कोटी

‘या’ स्टॉकने दिला घसघशीत परतावा, 5 महिन्यांत 10 हजारांचे झाले 1.37 कोटी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२२ । शेअर बाजार समजून घेणे आणि त्यानंतर त्यातून पैसे कमवणे अवघड असले तरी अशक्य नाही. BSE आणि NSE मध्ये असे अनेक Multibagger स्टॉक्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदारांचे नशीब रातोरात बदलून टाकले. इतकेच नाही तर काही शेअर्सने असा परतावा दिला, ज्याची गुंतवणूकदारांनी कल्पनाही केली नसेल.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्टॉकबद्दल सांगत आहोत, ज्याने 5 महिन्यांत 10 हजार रुपयांची गुंतवणूक 1.25 कोटी रुपयांच्या पुढे नेली आहे. म्हणजेच या शेअरने अवघ्या 5 महिन्यांत गुंतवणूकदारांना करोडपती बनवले. आम्ही SEL Manufacturing Company Ltd बद्दल बोलत आहोत. गेल्या 5 महिन्यांतच या समभागाने 1 लाख 37 हजार टक्क्यांहून अधिक घसघशीत परतावा दिला आहे.

SEL मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचा हिस्सा 5 महिन्यांपूर्वी 27 ऑक्टोबर 2021 रोजी NSE वर केवळ 35 पैसे होता. 15 मार्च 2022 रोजी बंद झालेल्या ट्रेडिंग आठवड्यात स्टॉक 480.35 रुपयांच्या पातळीवर गेला. 3 जानेवारी 2022 रोजी स्टॉक 44.40 रुपयांवर होता. महिन्याभरापूर्वी हा शेअर NSE वर 199.90 रुपयांच्या पातळीवर होता. जो आता वाढून 480.35 रुपये झाला आहे. या कालावधीतच, त्याने गुंतवणूकदारांना 140.30 टक्के परतावा दिला आहे.

जलद गुंतवणूक
पाच महिन्यांपूर्वी जर कोणी एसईएल मॅन्युफॅक्चरिंगच्या स्टॉकमध्ये 10 हजार रुपये 35 पैशांच्या पातळीवर गुंतवले असते, तर आज ते 1.37 कोटी झाले असते. जर तुम्ही वर्षाच्या सुरुवातीला त्यात एक लाखाची गुंतवणूक केली असती तर ती वाढून जवळपास 11 लाख झाली असती.

कंपनी काय करते
एसईएल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ही कापड कंपनी आहे. उत्पादन, प्रक्रिया याशिवाय ही कंपनी रेडीमेड कपडे आणि विविध प्रकारच्या टॉवेलचे उत्पादन करते.

शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणे हे अनेक प्रकारच्या जोखमींशी निगडीत आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या वैयक्तिक वित्त सल्लागाराचा सल्ला घ्याजळगाव लाईव्ह न्यूज याची सुष्टी करत नाही.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.