भुसावळ विभागातून धावणाऱ्या ‘या’ गाडीच्या फेऱ्यांना मुदतवाढ
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२२ । होळीच्या दिवशी घरी जाणाऱ्या लोकांच्या गैरसोयीपासून बचाव करण्यासाठी रेल्वेने होळी स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. होळी, धूलिवंदनामुळे प्रवाशांची वाढती गर्दी पाहता मुंबई-कानपूर-मुंबई आणि पुणे-जबलपूर-पुणे दरम्यान पूर्णत: आरक्षित साप्ताहिक विशेष रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यांना मुदतवाढ मिळाली आहे.
यात ०४१५२ लोकमान्य टिळक टर्मिनस-कानपूर साप्ताहिक अतिजलद विशेष २ एप्रिल ते १ अाॅक्टाेबरपर्यंत चालवण्यात येईल. ०४१५१ कानपूर-लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक अतिजलद विशेष गाडी १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत, ०२१३१ पुणे-जबलपूर साप्ताहिक अतिजलद विशेष गाडी २८ मार्च ते २७ जूनपर्यंत, ०२१३२ जबलपूर-पुणे साप्ताहिक अतिजलद विशेष गाडी २७ मार्च ते २६ जूनपर्यंत चालवण्यात येणार आहे.
दरवर्षी होळीच्या दिवशी मोठ्या संख्येने लोक आपापल्या घरी जातात. त्यामुळे गाड्यांमधील गर्दी वाढते आणि अनेकांना आरक्षण करता येत नाही. ज्या लोकांना सण साजरा करण्यासाठी घरी जायचे आहे, त्यांना होळी स्पेशल ट्रेन चालवल्याने मोठा फायदा होणार आहे. होळी स्पेशल ट्रेन देशाच्या जवळपास प्रत्येक भागातून धावत आहे.