जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मार्च २०२२ । भारतीय पेट्रोलियम विपणन कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) ने आज म्हणजेच १७ मार्च २०२२ रोजी पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले आहेत. IOCL नुसार आज गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. सलग १३३ व्या दिवशी इंधन दर स्थिर आहेत.आज जळगावमध्ये (Jalgaon) एका लिटर पेट्रोलचा दर १११.२९ रुपये इतका आहे. तर डिझेलचा ९४.२० रुपये प्रति लिटर इतका आहे.
गेल्या काही दिवसापूर्वी रशिया आणि युक्रेन युद्धामुळे कच्च्या तेलाचा भाव १३९ डाॅलरपर्यंत वाढला होता. मात्र आठवडाभरात त्यात मोठी घसरण झाली असून तो १०० डाॅलर खाली घसरला आहे. दरम्यान, आज भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर जारी केला आहे. त्यात आज पेट्रोल आणि डिझेल दर जैसे थेच ठेवले.
चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
दिल्ली पेट्रोल ९५.४१ रुपये आणि डिझेल ८६.६७ रुपये प्रति लिटर
मुंबई पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर
- चेन्नई पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटर
कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लिटर
या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलले आहेत
नोएडामध्ये पेट्रोल 95.48 रुपये आणि डिझेल 86.99 रुपये प्रति लिटर झाले आहे.
लखनऊमध्ये पेट्रोल 95.36 रुपये आणि डिझेल 86.88 रुपये प्रति लिटर झाले आहे.
जयपूरमध्ये पेट्रोल 106.89 रुपये आणि डिझेल 90.55 रुपये प्रति लिटर झाले आहे.
पाटणामध्ये पेट्रोल 105.90 रुपये आणि डिझेल 91.09 रुपये प्रति लिटर झाले आहे.
दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.