गुन्हेयावल

धक्कादायक : गुन्हा दाखल केल्याच्या रागातून २५०० केळीचे खोड कापून फेकले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२२ । चिनावल (ता. रावेर) शिवारात शेतातील उभे पीक कापून फेकण्याच्या घटनेचे लोण आता यावल तालुक्यात पसरू लागले आहे. शेतात शेळ्या चारणाऱ्या सहा गुराख्यांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल केल्याच्या रागातून सहा संशयितांनी शेतातील टिश्यूकल्चर जातीचे २५०० केळीचे घड कापून फेकल्याची घटना यावल तालुक्यातील अट्रावल येथे घडलीय. यामुळे येथील प्रगतशील शेतकरी किशोर देवराम राणे यांचे ६ लाख रुपयांचे नुकसान झाले.

किशोर राणे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, त्यांनी दिनकर पुंडलिक वारके यांचे सोमवार रस्त्यावरील शेत बटाईने केले आहे. तेथे त्यांनी ३५०० खोड केळी लागवड केली आहे. या बागेतील २५०० केळीचे घड शेळ्या चारणाऱ्या गुराख्यांनी त्यांचे विरूद्ध पोलिसांत तक्रार दिल्याच्या रागातून मध्यरात्री कापून टाकले. राणे यांनी अट्रावल रस्त्यावर बटाईने केलेल्या शेतात शनिवारी (ता.१२) सहा गुराखी हरभरा पिकात जबरदस्तीने शेळ्या चारत होते. त्यांना हटकल्याने संशयितांनी राणे यांना मारहाण केली होती. यामुळे त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल झाला.

याचा राग येऊन संशयित राजेंद्र काशीनाथ जाधव, विनोद गोविंदा खैरे, स्वप्नील उर्फ भुरा छगन धनगर, एकनाथ तोताराम भील, अनिल गंगाधर धनगर (सर्व रा.यावल) यांनी किशोर राणे यांना केळी कापून फेकण्याची धमकी दिली होती. ती संशयितांनी रात्रीतून खरी केली. राणे यांच्या तक्रारीवरुन राजेंद्र काशीनाथ जाधव, विनोद गोविंदा खैरे, स्वप्नील उर्फ भुरा छगन धनगर, एकनाथ तोताराम भील, अनिल गंगाधर धनगर (सर्व रा.यावल) यांचे विरुद्ध गुन्हा दाखल झाला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button