जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मार्च २०२२ । रशिया – युक्रेन युद्धामुळे गेल्या आठवड्यात क्रुड ऑईलचा दर १३५ ते १४० डॉलरवर गेला होता. मात्र आता कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने घसरण होत असून आंतरराष्ट्रीय बाजारात क्रुड ऑईलचा दर १०३ डॉलर प्रतिबॅरलपर्यंत खाली आलाय. भारतात आज मंगळवारी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. सलग १३१ व्या दिवशी इंधन दर स्थिर आहेत. आज जळगावमध्ये (Jalgaon) एका लिटर पेट्रोलचा दर १११.२९ रुपये इतका आहे. तर डिझेलचा ९४.२० रुपये प्रति लिटर इतका आहे.
गेल्या सोमवारी कच्च्या तेलाचा भाव १३९.१३ डाॅलरपर्यंत वाढला होता. २००८ नंतरची ही तेलाची सर्वोच्च पातळी होती. मात्र, गेल्या काही दिवसात कच्च्या तेलाचा दर प्रतिबॅरल 30 डॉलरने कमी झाले आहे. रशिया-युक्रेन युद्ध अन्य देशांत पसरण्याची शक्यता मावळत चालल्यामुळे तसंच जागतिक अर्थव्यवस्थेला फटका बसण्याच्या भीतीमुळे कच्च्या तेलाचे दर घसरल्याचं मानलं जातंय.
भारतात पेट्रोल, डिझेल स्वस्त होण्याची शक्यता आहे. कमी दरात इंधन विक्रीची ऑफर रशियानं भारत सरकारपुढे ठेवलीये..रशियाची ही ऑफर भारताच्या विचाराधीन असल्याचं समजतंय. तर रुपया आणि रशियाचं चलन रुबल सेटलमेंट यंत्रणेवरही काम सुरू असल्याचं कळतंय
देशातील बड्या शहरातील दर
आज मंगळवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०९.९८ रुपयांवर स्थिर आहे. दिल्लीत पेट्रोल ९५.४१ रुपये झाले आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०४.६७ रुपयांवर स्थिर आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.५१ रुपये इतका आहे. भोपाळमध्ये पेट्रोलचा भाव १०७.२३ रुपये आहे. तर देशात सर्वात कमी दरात पेट्रोल आणि डिझेल दिल्लीजवळील नोएडा शहरात मिळत आहे. नोएडामध्ये आज एक लीटर पेट्रोलचा भाव ९५.५१ रुपये आहे.
आज एक लीटर डिझेलचा मुंबईत ९४.१४ रुपये भाव आहे. दिल्लीत डिझेल ८६.६७ रुपयांवर कायम आहे. चेन्नईत आज डिझेलचा भाव प्रती लीटर ९१.५३ रुपये इतका झाला. कोलकात्यात मात्र डिझेलचा भाव ८९.७९ रुपयांवर कायम आहे. भोपाळमध्ये डिझेलसाठी ९०.८७ रुपये दर आहे. नोएडामध्ये आज एक लीटर डिझेल दर ८७.०१ रुपये आहे.