⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | वाणिज्य | कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण; पेट्रोल-डिझेल दरांबाबत कंपन्यांनी घेतला हा निर्णय

कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण; पेट्रोल-डिझेल दरांबाबत कंपन्यांनी घेतला हा निर्णय

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ मार्च २०२२ । रशिया आणि युक्रेन युद्धाने कच्च्या तेलाचा भाव १३९ डाॅलरवर गेला होता. त्यामुळे पाच राज्याच्या निवडणूक निकालांनंतर पेट्रोलियम कंपन्या इंधन दरवाढ करतील, अशी अपेक्षा होती, मात्र आठवडाभरात तेलाचा भाव ११० डाॅलरखाली गेला आहे. परिणामी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला.

पेट्रोलियम कंपन्यांनी सलग १३० व्या दिवशी प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल डिझेल दरात कोणताही बदल केलेला नाही. आज जळगावमध्ये (Jalgaon) एका लिटर पेट्रोलचा दर १११.२९ रुपये इतका आहे. तर डिझेलचा ९४.२० रुपये प्रति लिटर इतका आहे.

कमॉडिटी बाजारात आज सोमवारी ब्रेंट क्रूडचा भाव ३.६ टक्क्यांनी कमी झाला आणि तो १०८.५५ डॉलर प्रती बॅरल इतका झाला. यूएस डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव १०५.४० डाॅलर इतका झाला आहे. त्यात ३.९३ टक्के घसरण झाली. गेल्या सोमवारी कच्च्या तेलाचा भाव १३९.१३ डाॅलरपर्यंत वाढला होता. २००८ नंतरची ही तेलाची सर्वोच्च पातळी होती.

दरम्यान तेलाचा भाव १०० डाॅलर खाली येईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे कंपन्यांनी दरवाढीबाबत सावध भूमिका घेतली आहे. आज सोमवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०९.९८ रुपयांवर स्थिर आहे. दिल्लीत पेट्रोल ९५.४१ रुपये झाले आहे. कोलकात्यात एक लीटर पेट्रोल १०४.६७ रुपयांवर स्थिर आहे. चेन्नईत पेट्रोलचा भाव १०१.५१ रुपये इतका आहे. भोपाळमध्ये पेट्रोलचा भाव १०७.२३ रुपये आहे. तर देशात सर्वात कमी दरात पेट्रोल आणि डिझेल दिल्लीजवळील नोएडा शहरात मिळत आहे. नोएडामध्ये आज एक लीटर पेट्रोलचा भाव ९५.५१ रुपये आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.