जळगाव जिल्हाजळगाव शहर

जळगाव केंद्रातून इंदौरचे ‘डहूळ’ प्रथम तर मु.जे. महाविद्यालयाचे ‘ब्लडी पेजेस’ द्वितीय

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२२ । महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत जळगाव केंद्रातून नाटयभारती, इंदौर या संस्थेच्या डहूळ या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव या संस्थेच्या ब्लडी पेजेस या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे. या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे जळगाव केंद्रावरील अन्य निकाल समर्थ बहूउद्देशीय संस्था, जवखेडे या संस्थेच्या महापात्रा या नाटकासाठी तृतीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक श्रीराम जोग (नाटक-डहूळ), द्वितीय पारितोषिक वैभव मावळे (नाटक- ब्लडी पेजेस ), प्रकाश योजना प्रथम पारितोषिक अभिजित कळमकर (नाटक-डहूळ), द्वितीय पारितोषिक उमेश चव्हाण (नाटक- ब्लडी पेजेस), नेपथ्य : प्रथम पारितोषिक अनिरुध्द किरकिरे (नाटक- डहूळ), द्वितीय पारितोषिक दिनेश माळी (नाटक- ब्लडी पेजेस), रंगभूषा : प्रथम पारितोषिक योगेश लांबोळे (नाटक-महापात्रा), द्वितीय पारितोषिक प्रज्ञा बि-हाडे (नाटक-ब्लडी पेजेस) उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक दिपक महाजन (नाटक-ब्लडी पेजेस) व नेहा पवार (नाटक-महापात्रा), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे रुपा अग्रवाल (नाटक-एक चौकोन विस्कटलेला), पुर्वा जाधव (नाटक-महापात्रा), स्वप्ना लिंबेकर भट (नाटक-माणूस नावाचे बेट), सौ.कांचन अटाळे (नाटक-बळी), गायत्री ठाकूर (नाटक-फक्त चहा), शरद भालेराव (नाटक- दिशा), चंद्रकांत चौधरी (नाटक- स्टे), हनुमान सुरवसे (नाटक-सेल मोबाईल आणि…), अनिल कोष्टी (नाटक-सोडी गेला बाबा), योगेश शुक्ल (नाटक-वेग्गळं असं काहीतरी) विजेत्यांचे सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे आणि जळगावचे राज्य नाट्य समन्वयक दिपक पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Back to top button