जळगाव लाईव्ह न्यूज । ०७ एप्रिल २०२१ । जिल्ह्यासह शहरात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी ५ एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले. याच पार्श्वभूमीवर आज बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनीशहरातील मुख्य चौकात आणि मार्केट परिसरात पाहणी करून अनावश्यक सुरू असलेल्या दुकानांना बंद ठेवण्याच्या सुचना देण्यात आले.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शहरासह जिल्ह्यात जिल्हाधिकारी अभिजित राउत यांनी कडक निर्बंध लागू केले आहे. यानुसार पारित केलेल्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. दरम्यान, दुकानदार अजूनही संभ्रमावस्थेत आहे. आज ७ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांनी शहरातील सुभाष चौक, गांधी मार्केट, फुले मार्केट, दाणबाजार, गोलाणी मार्केट परिसरात रस्त्यावर उतरून पाहणी केली. यात काही अनावश्यक सुरू असलेल्या दुकानांना प्राथमिक स्वरूपात बंद करण्याचे ताकिद दिली. उद्यापासून याची अंमलबजावणी कडकपणे करण्याचा येईल असा इशारा देखील दिला.
याप्रसंगी उपायुक्त संतोष वाहूळे, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय येरूळे, शनीपेठ पोलीस ठाण्याचे पो.नि. विठ्ठल ससे, पोहेकॉ विजय निकुंभ यांच्यासह महापालिका कर्मचारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
https://www.facebook.com/JalgaonLiveNews/videos/179262180587411/