⁠ 
शनिवार, मे 18, 2024

जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता, IMD कडून ‘ऑरेंज अलर्ट’

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२२ । पुढील दोन दिवस राज्यात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची होण्याचा अंदाज देखील हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात दि ८ व ९ मार्च रोजी विजेच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जिल्ह्याला आज आणि उद्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे काढणीवर आलेले हरभरा, गहू, दादरसह इतर रब्बी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसापूर्वी हवामान खात्याने राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता. ७ ते १० मार्च दरम्यान, राज्यातील विविध भागात विजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील इतर भागासह जळगाव जिल्ह्यात काल अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

सोमवारी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. दरम्यान,आज आणि उद्यासाठी जळगाव जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट (orange alert)जारी करण्यात आला आहे. यावेळी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

काल सायंकाळी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात गारपिटीसह जोरदार अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्याचं मोठं नुकसान