जळगाव लाईव्ह न्यूज । महिलादिन विशेष । उद्योगिनी म्हणजे उद्योग व्यवसाय करणारे पण निव्वळ उद्योगच नाही, तर त्यासंबंधीचे सर्व ज्ञान असणारी असावी. या हेतूने ” उद्योगिनी ” ह्या नावाने १ सप्टेंबर २०१८ पासून मी उद्योगिनी रुपी नवीन क्षेत्रात पदार्पण केले.
मुळची मी वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन ची विषयाची खानदेशातील पहिली पीएचडी धारक महिला पत्रकार आणि तेही पुणे विद्यापीठाची पीएचडी. १८ वर्षाचा वृत्तपत्र, आकाशवाणी, आणि प्राध्यापक या माध्यमातून नोकरी चा प्रवास तर केलाच परंतु काहीतरी वेगळे करायचे ही जिद्द व बचत गट महिला संघटन याची आवड यादृष्टीने उद्योगिनी ची कल्पना सुचली. लग्नानंतर मी स्वतः बचत गटात सदस्य होते. त्यामुळे बचत गट ही संकल्पना पूर्णपणे माहित होती. बचत गटाच्या महिलांच्या अडचणी आणि समस्या याची चांगली जाणीव होती. बचतगटाच्या महिलांसमोर खरे आव्हान असते ते तयार झालेला माल विकायचा कुठे? याची. आणि यालाच संलग्न बहुतेक सर्व बँका या प्रश्नांना तिलांजली देत, निव्वळ अधिकाधिक गट सुरू कसे करता येईल याकडे लक्ष देतात म्हणूनच बचत गटाच्या महिलांना व छोट्या व्यावसायिकांना ३६५ दिवस उद्योजकीय व्यासपीठ मिळावे. या हेतूने २०१६ मध्ये बचत गटाच्या घरगुती उत्पादनांचा मॉल या संकल्पनेचा मी प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला.
जळगाव शहरातील २१ बँक व महापालिका यांच्याकडे हा प्रोजेक्ट रिपोर्ट सादर केला. स्वतः दुकान सुरू करणे इतके आर्थिक पाठबळ माझ्याकडे नव्हते, परंतु वर्ष दीड वर्ष या रिपोर्ट ला कोणीच प्रतिसाद दिला नाही.सरतेशेवटी आर्थिक नाही, पण माझे पती पंकज पवनीकर यांच्या भक्कम पाठिंब्याने १ सप्टेंबर २०१८ ला मी उद्योगिनी सुरू केले. बचत गट, छोटे आणि स्थानिक उद्योजक निर्मित सर्व प्रकारच्या वस्तूंचे स्मार्ट गृहिणींसाठी परिपूर्ण दालन अशी टॅगलाईन तर दिली.
तरीहि उद्योगिनी चा प्रवास सुखकर नव्हता. अवघ्या ६ उद्योजकांच्या उत्पादनांवर दुकान सुरू केले, सुदैवाने भास्कर मार्केटमध्ये मोक्याच्या जागी दुकान भाड्याने उपलब्ध झाले हीच काय ती जमेची बाजू दुकानात वस्तू वाढविण्यासाठी विविध बचतगटच्या मिटीग घेतल्या. इतर जिल्हातील छोट्या व्यवसायिकाना स्वत संपर्क करून दुकानात वस्तु ठेवन्याची विनंती केली
खाद्यपदार्थांचे दुकान सुरू करताना शासनाचे विविध प्रकारचे परवाने घ्यावे लागतात त्यात फूड लायसन्स, उद्योग आधार ,शाँप अॅक्ट हे सर्व परवाने मी स्वतः ऑनलाइन काढले
हे क्षेत्र माझ्यासाठी नवीनच होते परंतु मालाची गुणवत्ता,पॅकिंग, जाहिरात ,मार्केटिंग या सर्व गोष्टींचा विचार करून विविध योजना राबविल्या इतर जिल्ह्यातील प्रसिद्ध किवा प्रचिलित खाद्यपदार्थ जळगावात मिळावे या हेतूने सोलापूर,औरंगाबाद,नांदेड नागपूर,कोकण पुणे इ जिल्हातून वस्तु मागविल्या यामुळे त्या जिल्हातील बचतगट व व्यवसायिक यांना जळगावात बाजारपेठ उपलब्ध करून दिली
उपक्रम
१)उद्योगिनी मार्फत बचत गटांना विविध प्रकारचे मार्गदर्शन करण्यात येते
२)सामान्यतः मोठ्या शहरांमध्ये वस्तूंचे प्रदर्शन व विक्रीचे स्टॉल आयोजित केले जातात परंतु उद्योगिनीनेे जळगावच्या बाजूने असलेल्या छोट्या गावांमध्ये बचत गट व छोट्या व्यवसायिक महिलांसाठी प्रदर्शने आयोजित केली तसेच जळगाव शहरातील महत्त्वाच्या भागांमध्ये असे प्रदर्शन भरविले जाते
३) येत्या एप्रिलमध्ये जळगावात ५ भागात उद्योगिनी महोत्सव आयोजित केला जाणार आहे
आज उद्योगिनीत सर्व प्रकारचे ३००-३५० घरगुती उत्पादने आहे ३२ महिला बचतगट व 25-30 छोटे व्यावसायिक यांना उद्योगिनी ने व्यावसायिक व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे तसेच ४00 च्या वर महिला व पुरुष व्यावसायिक यांना दर महिन्याला रोजगाराच्या संधी आम्ही मिळवून देतो जळगावसह १० जिल्हामधून वस्तु विक्रीसाठी उद्योगिनीत येतात. अनेक व्यावसायिक व महिला बचतगट आता स्वत उद्योगिनीत वस्तु ठेवण्यास उत्सुक आहे.
सर्व प्रकारचे पीठे, आवळा उत्पादने, वाळविण्याचे सर्व पदार्थ , २० प्रकारचे लोणचे उपवास पापड, नागली,गहू बिस्किट अनेक पदार्थ या व्यतिरिक्त पूजेचे सर्व सामान ,रूखवंतच्या वस्तु, सौंदर्यप्रसाधने, पंचगव्यची उत्पादने असे ३५० प्रकारच्या वस्तु आहेत लोकांच्या आरोग्याच्यादृष्टीने पौष्टिक व गुणवत्ता असलेले हे सर्व उत्पादने आहे
केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता सामाजिक बांधीलकी जपण्यासाठी बारीपाडा येथील वनवासी शेतकरी उत्पादने, मेळघाट, अमरावती येथील बांबूच्या विविध वस्तु तसेच चंद्रपूर येथील संस्था यांची उत्पादने उद्योगिनीत विक्रीसाठी उपलब्ध आहे लोकांचा कल आता घरगुती व पौष्टिक खाद्यपदार्थकडे अधिक आहे उलट ब्रन्डड वस्तु आमच्याकडे कोणीही मागत नाही उद्योगिनी स्मार्ट गृहिणीसाठी परिपूर्ण दालन करण्याचा प्रयत्न आमचा सुरु आहे
डॉ मंजुषा पंकज पवनीकर
९४०३४७८७८४