⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | सोने - चांदीचा भाव | Gold-Silver : सोने-चांदी पुन्हा रेकार्ड स्तरावर, खरेदीपूर्वी वाचा आजचे भाव

Gold-Silver : सोने-चांदी पुन्हा रेकार्ड स्तरावर, खरेदीपूर्वी वाचा आजचे भाव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२२ । रशिया आणि युक्रेन (Rasia Urekain war) युद्ध संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. युद्धाच्या झळा अधिक तीव्र झाल्याने सोने-चांदीची (Gold Silver Rate) चकाकी पुन्हा वाढली आहे. जळगाव (Jalgaon) सुवर्णनगरीत सलग दुसऱ्या दिवशी सोने भावात मोठी वाढ झाली आहे. आज मंगळवारी १० ग्रॅम सोन्याच्या भावात ९८० रुपयाची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदी ८३० रुपये प्रति किलोने महागली आहे. त्यापूवी काल सोने ८१० रुपयाने तर १२८० रुपयाने महागली होती.

दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढल्यास सोन्याच्या दरात आणखी वाढ होईल, असे मानले जात आहे. सोने लवकरच ६०,००० रुपये प्रति १० ग्रॅमची पातळी गाठू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

आजचा सोने आणि चांदीचा भाव?
आज जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५४,७७० रुपये प्रति तोळा इतका आहे. तर चांदीचा ७१,६१० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते.

रशिया व युक्रेन यांच्यातील तणावामुळे गेल्या महिन्यापासूनच सोने-चांदीच्या भावात वाढ होण्यास सुरुवात झाली. त्यात आता दोन आठवड्यापासून तर अधिकच वाढ होत असून सोमवारी तर सोने-चांदी उच्चांकीवर पोहचले आहे. गेल्या नऊ दिवसात सोने जवळपास ३,००० रुपये प्रति तोळ्याने वधारले आहे. तर दुसरीकडे चांदी प्रति किलो जवळपास ६ हजार रुपयांनी वाधरली आहे.

२८ फेब्रुवारी सोने ५१,४०० रुपयांवर होता. त्यात सातत्याने वाढ होऊन सोने ५४ हजारांवर गेला आहे. कोरोनाचा संसर्ग पसरल्यानंतर लॉकडाऊन काळातही सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ झाली होती. त्या वेळी जुलै ते ऑगस्ट २०२० मध्ये सोने ५५ हजारावर पोहचले होते. त्यानंतर मात्र ते कमी-कमी होत गेले. आता पुन्हा युद्धामुळे सोने ५४ हजारांवर गेले आहे. तसेच त्या वेळी चांदी ७७ हजारावर पोहचली होती. आता ती पुन्हा ७१ हजारांच्या पुढे गेली आहे.

गेल्या आठवड्यातील दर?
जळगाव सराफ बाजारात सोमवारी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ५१,४०० रुपये इतका होता. त्यानंतर मंगळवारी ५१,४००, बुधवारी ५३,०३०, तर आज गुरुवारी ५२,५०० रुपये इतका आहे. दुसरीकडे सोमवारी चांदीचा प्रति किलोचा दर ६५,५२० रुपये इतका होता. त्यानंतर मंगळवारी ६५,५२०, बुधवारी ६८,५७०, गुरुवारी ६८,५३० रुपये प्रति किलो इतका होता.

हे देखील वाचा :

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.