जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२२ । अमळनेर येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिरात भागवताचार्य पंडीत अतुलशास्त्री भगरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व अनेक तज्ञ पुरोहित यांच्या उपस्थितीत महाशिवरात्री निमित्ताने मंदिरात सायंकाळी लघुरुद्र महापुजा झाली.
यापूजेचे मुख्य यजमान पालिकेचे मुख्यधिकारी प्रशांत सरोदे होते. जळगावचे राहुल शरदराव पाटील, डॉ.सुमित सूर्यवंशी, अभिषेक पाटील, ज्ञानेश्वर धनगर, ज्ञानेश्वर कुमावत, कैलास पाटील, हरेश अहिरराव, कैलास पाटील, उद्योगपती वसंत पाटील, जितेंद्र अग्रवाल, संभाजी पाटील हे सपत्नीक महापुजेचे मानकरी होते. पूजेनंतर भगरे गुरुजीनीं महाशिवरात्रीचे धार्मिक, पौराणिक, वैज्ञानिदृष्ट्या महत्त्व विषद केले. व्यंकटेश कळवे गुरुजी, सदाशिव जोशी, संतोष शौचे (नाशिक) सारंग पाठक, केशव पुराणिक, मिलिंद उपासनी, गिरीश पैठणे, सुनील मांडे, प्रसाद भंडारी, तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य, गणेश जोशी,यतीन जोशी, मेहुल कुलकर्णी यांनी पौराहीत्य केले.
यावेळी मंदिराचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस.एन. पाटील, सचिवएस.बी.बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्थ दिलीप बहिरम, अनिल अहिराव, जयश्री साबे आनंद महाले, डी. ए.सोनवणे व सेवेकरी बंधुनीं महापूजेच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.