⁠ 
शनिवार, जानेवारी 11, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | आमदार अनिल पाटलांचा आवाहनामुळे धरणावर जमला धरण प्रेमींचा मेळा

आमदार अनिल पाटलांचा आवाहनामुळे धरणावर जमला धरण प्रेमींचा मेळा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२२ । अमळनेर तालुक्यातील निम्न तापी पाडळसरे प्रकल्प शेतकरी आणि जनतेसाठी नवसंजीवनी’च्या काळात खंड पडलेल्या धरणाच्या कामात गती येत असल्याने या कामास सर्व धरण प्रेमींच्या सदिच्छा मिळाव्यात म्हणून आ.अनिल पाटील यांनी दि 6 रोजी धरण पाहणीचा सामूहिक दौरा आयोजित केला होता. यानिमित्ताने त्यांनी तमाम पाडळसरे धरण प्रेमी आणि राजकीय, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते आणि शेतकरी बांधवाना “चला जाऊया पाडळसरे धरणावर” असे भावनिक आवाहन केले होते, रविवारी सकाळी 9.30 वाजता हा धरण पाहणी दौरा झाला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी विधानसभा सभापती अरुणभाई गुजराथी, प्रमुख उपस्थिती माजी आ.डॉ बी एस पाटील, चोपडा’चे माजी आमदार कैलास पाटील, चोसाका चेअरमन घनश्याम पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, विनोदभैय्या पाटील, जि.प.सदस्या जयश्री पाटील, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, अधीक्षक अभियंता वाय के भदाणे, ग्रंथालय विभागाच्या रिता बाविस्कर, सुनीता पाटील, प्रा. रंजना देशमुख, योजना पाटील, कविता पवार, आशा चावरिया, माधुरी पाटील व पाडळसरे धरण जनआंदोलन समितीचे सर्व कार्यकर्ते तसेच राजकीय, सामाजिक पदाधिकारी होते.

आमदार पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले की, आज प्रत्यक्ष धरणाचे प्रत्यक्षात आतमध्ये काँक्रीटीकर काम काम सुरू करताना आनंद होतोय, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व जलसंपदा मंत्री ना जयंत पाटील यांचे आभार मी मानतो, मागील पाच वर्षात युती शासन असताना धरणाचे काम ठप्प होते, पण या महाविकास आघाडी शासनाच्या काळात पुन्हा सुरू झाले, यासाठी दोन वर्षात सातत्याने बैठका झाल्या 90 ते 95 टक्के तांत्रिक अडचणी दूर झाल्यात आता काँक्रीट काम सुरू झाल्याने प्रत्येक पेअर 10 मीटर पर्यंत मे पर्यंत पूर्ण होईल, एकूण 156 मीटर पर्यंत पिअर्स काम पूर्ण झाल्यावर मग धरणाचे वरचे कामही सुरू होईल,पाणी उचलण्यासाठी लिफ्ट देखील आवश्यक असल्याने येथे 5 लिफ्ट योजना मंजुर करीत असून त्यासाठी सब स्टेशनची मागणीही वीज कंपनीकडे केली आहे,या धरणामुळे 40 हजार हेक्टर अमळनेर तालुक्यातील जमीन ओलीत खाली येणार आहे,व आजूबाजूचे जिल्हे आणि तालुक्यांनाही फायदा होणार आहे.धरणाची आजची किंमत 3200 कोटी झाली आहे,युक्रेन व रशिया युद्धमुळे ती वाढूही शकते,राज्य शासनाकडून 25 हजार कोटी कर्जाची केंद्रा शासनाकडे मागणी आहे, त्यातून निधी मिळू शकतो याशिवाय थेट केंद्राच्या योजनेत बसविण्याचे प्रयत्न सुरू आहेत,आतापर्यंत 495 कोटी रुपये खर्च धरणावर झाला आहे,मात्र पुढच्या मार्च पर्यंत 700 ते 800 कोटी निधी खर्च झाला असेल,युती शासनाने लक्ष दिले असते,जिल्ह्यातील तत्कालीन जलसंपदा मंत्र्यांनी लक्ष दिले असते तर कामास गती येऊन आज हे पाणी आपण वापरू शकलो असतो पण त्यांनी छदाम त्यांनी दिला नाही अशी खंत आमदारांनी व्यक्त केली.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह