जळगाव लाईव्ह न्यूज । ०४ मार्च २०२२ । येथील श्री जैन युवा फाउंडेशनतर्फे दरवर्षीप्रमाणे उद्योग उत्सव २ तथा आनंद मेळा २०२२ हा ५ व ६ मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा मेळा खान्देश सेंट्रल मॉल मैदानावर होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या आनंद मेळाचे उद्घाटन सकाळी ११ वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. मेळ्याला प्रमुख प्रायोजक जी.एच.रायसोनी पब्लिक स्कुल तर सह प्रायोजक नेक्सा व हाऊस ऑफ ज्वेल्स आहेत. यावेळी जागतिक महिला दिन मंगळवारी येत असल्याने या मेळ्यामध्ये ८० टक्के सहभाग महिला विक्रेत्यांचा ठेवण्यात आला आहे.
नागरिकांनी उद्योग उत्सव तथा आनंद मेळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन प्रोजेक्ट चेअरमन दीपा राका, स्वाती पगारिया, रिकेश गांधी, राहुल बांठिया,अध्यक्ष आनंद चांदीवाल, सचिव विनय गांधी, कोषाध्यक्ष पारस कुचेरीया यांनी केले आहे.
आनंद मेळ्यात…
यंदा उद्योग उत्सव तथा आनंद मेळ्यात महिलांची स्टॉल्स असणार आहेत. यामध्ये लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत विविध प्रकारचे कपडे, पादत्राणे, खाद्यपदार्थ, खेळणी व इतर साहित्य असणार आहे. तसेच विविध स्पर्धा देखील मुलांसाठी आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये माझ्या आयुष्यातील रोल मॉडेल, सुदृढ बालक स्पर्धा, टॅलेंट हंट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.