गुन्हेजळगाव जिल्हा

शहरातील दोघांच्या‎ हद्दपारीचे आदेश‎

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ मार्च २०२२ । ‎ आगामी पालिका व स्थानिक‎ स्वराज्य संस्थांच्या निवडणुका‎ पाहता पोलिस प्रशासनाने‎ उपद्रवींच्या हद्दपारीचे प्रस्ताव‎ प्रांतांकडे सादर केले आहेत.‎ त्यावर निर्णय देत गुरुवारी‎ प्रांतांनी गणेश कवाडे व राहूल‎ काेळी या दोघांना प्रत्येकी एक‎ व दाेन वर्षांसाठी जळगाव‎ जिल्ह्यातून हद्दपार केले.‎

स्थानिक पोलिस प्रशासनाने‎ प्रांतांधिकाऱ्यांकडे प्रस्ताव‎ पाठवले होते. या प्रस्तावांवर‎ अंतिम कामकाज हाेऊन‎ शहरातील दोघांच्या हद्दपारीचे‎ आदेश निघाले. त्यात गणेश‎ रमेश कवडे (रा.गमाडिया‎ प्रेस, जुनी जीन, भुसावळ)‎ याला एका वर्ष, तर राहुल‎ नामदेव कोळी (रा.जुना‎ सातारा, मरिमाता‎ मंदिराजवळ, भुसावळ)‎ याला दोन वर्षांसाठी हद्दपार‎ करण्यात आले. कवडे विरूद्ध‎ हाणामारी, प्राणघातक हल्ला,‎ शासकीय कामकाजात‎ अडथळा असे ७ गुन्हे, तर‎ राहुल कोळी विरूद्ध जबरी‎ लूट व हाणामारीचे चार गुन्हे‎ आहेत.‎

Related Articles

Back to top button