⁠ 
शुक्रवार, नोव्हेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | चोपडा | हृदयद्रावक : दोन चिमुकल्या मुलींसह आईची विहिरीत उडी घेत आत्महत्या, पती अत्यावस्थ

हृदयद्रावक : दोन चिमुकल्या मुलींसह आईची विहिरीत उडी घेत आत्महत्या, पती अत्यावस्थ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मार्च २०२२ । चोपडा तालुक्यातील बीडगाव येथे हृदय पिघळून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका विवाहितने दोन चिमुकल्या मुलींसह विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. वर्षा विनोद बाविस्कर(वय 35) असे महिलेचे नाव असून किर्ती व मोनाली असे दोन चिमुकल्या मुलींचे नाव आहे. ही धक्कादायक घटना आज गुरुवारी उघडकीस आली असून तिघांचे मृतदेह विहिरीतून काढून चोपडा उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले आहे.

नेमकी काय आहे घटना?
चोपडा तालुक्यातील बीडगाव येथील विनोद विक्रम बाविस्कर (कोळी) वय-४० हे पत्नी वर्षा बाविस्कर, मुलगी खुशी, किर्ती, मोनाली या तीन मुलींसह वास्तव्याला आहे. दरम्यान, विनोद याचे बुधवारी पैशाच्या देवाणघेवाणवरून आईवडील आणि भाऊ यांच्याशी वादविवाद झाला. यात संतापाच्या भरात विनोद बाविस्कर याने विषारी औषध घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांची प्रकृती खालावल्याने त्याला तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले.

दरम्यान, पतीने विषारी औषध घेतल्याचा पत्नी वर्षा बाविस्कर हिला प्रचंड धक्का बसला. वर्षा हिने आज सकाळी किर्ती आणि मोनाली या दोन मुलींसह बीडगाव शिवारातील गट क्रमांक २३४ मधील इकबाल शहादूर तडवी यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. सुदैवाने मोठी मुलगी खुशी ही मामाच्या घरी गेली असल्याने ती या घटनेपासून दूर राहील्याने बचावली आहे.

तिघांनी आत्महत्या केल्याची माहिती गावातील पोलीस पाटील रामकृष्ण पाटील यांनी अडावद पोलीस ठाण्यात दिली. घटनेची माहिती मिळाताच अडावद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीतून तिघांचा मृतदेह काढण्यात आला. शवविच्छेदन करण्यासाठी चोपडा उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.