जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मार्च २०२१ । काेराेना काळात करवसुलीवर झालेला परिणाम लक्षात घेता महापालिकाने कर वसुलीसाठी कडक उपायोजना करण्याचे ठरवले आहे. यावेळी माेठ्या थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करताना नळ कनेक्शन देखील बंद करण्यात येणार आहे.
जळगाव महापालिकेने ७ जानेवारीपासून थकबाकीदारांसाठी अभय याेजना सुरू केली होती. १० मार्चपर्यंत ही याेजना सुरू राहणार आहे.या योजनेअंतर्गत थकबाकीदारांना शास्तीच्या रकमेत २५ टक्के सुट मिळत आहे. अनेक वर्षांपासून कर न भरणाऱ्या थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक प्रभाग समितीत ३ असे संपुर्ण शहरात १२ विशेष पथक मनपातर्फे तयार करण्यात आले आहेत.