जळगाव लाईव्ह न्यूज । १ मार्च २०२२ । मायक्रोसॉफ्ट कॉर्पचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला आणि त्यांची पत्नी अनु यांचा मुलगा झेन नडेला यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. तो २६ वर्षांचा होता. जन्मापासूनच सेरेब्रल पाल्सी या आजाराने ग्रासलेला असल्याने त्याचे निधन झाले आहे.
मायक्रोसॉफ्ट कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये झेनच्या निधनासंबंधी सांगितलं आहे. या संदेशात अधिकाऱ्यांना नडेला कुटुंबासाठी प्रार्थना करण्यास सांगितलं आहे.
२०१४ मध्ये सीईओपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर नडेला यांनी दिव्यांग व्यक्तींना उत्तम सेवा देण्यासाठी कंपनीचं प्रोडक्ट डिझाईन करण्यावर आपलं लक्ष केंद्रीत केलं होतं. यासाठी त्यांनी आपला मुलगा झेनचं उदाहरणही दिलं होतं. मागील वर्षी द चिल्ड्रन हॉस्पीटलने या ठिकाणी झेनवर उपचार करण्यात आले होते.
आता सिएटल चिल्ड्रेन सेंटर फॉर इंटिग्रेटिव्ह ब्रेन रिसर्चचा भाग म्हणून झेन नडेला एडेड चेअर इन पॅडेट्रिक न्यूरोसायन्सची स्थापना केली जाणार आहे. “झेनला संगीताची खुप आवड होती. त्याचं हास्य आणि आपलं कुटुंब आणि प्रियजनांसाठी त्यानं दिलेला आनंद कायमच लक्षात ठेवला जाईल,” अशी प्रतिक्रिया मुलांच्या रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ स्परिंग यांनी आपल्या संचालक मंडळाला लिहिलेल्या संदेशाद्वारे दिली.
हे देखील वाचा :
- महायुतीत मुख्यमंत्री निवडीसाठी मोठ्या हालचालींना वेग; कोण होणार मुख्यमंत्री?
- सोन्याने उधळला दरवाढीचा गुलाल; जळगावात आज प्रति ग्रॅमचा भाव किती?
- आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला राहील; वाचा रविवारचे तुमचे राशिभविष्य
- जळगावकरांचे प्रचंड आभारी आहे; “हॅट्ट्रिक” साधून विजयी झाल्यानंतर आ. राजूमामांची प्रतिक्रिया
- जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटीलांचा पुन्हा विजय ; विरोधकांना चारली धूळ