जळगाव लाईव्ह न्यूज । २८ फेब्रुवारी २०२२ । अमळनेर येथील आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने ग्रामिण भागात मुबलक निधीमुळे अनेक गावांचे स्वरूप बदलत आहे. आता पुन्हा आमदार निधीतून अमळगाव येथील आठवडे बाजार चौकात 10 लाख रुपये निधीतुन काँक्रीटीकरणाचे भूमिपूजन करण्यात आल्याने या चौकास नवे रूप मिळणार आहे.
ग्रामिण भागात अमळगाव हे मोठ्या गावांपैकी एक असून या गावास आजूबाजूची अनेक लहान गावे व्यावहारिक तथा बाजाराच्या दृष्टीने या गावाशी जुळली आहेत, याठिकाणी दर आठवड्याला भाजी बाजार भरत असतो, परंतु काळाच्या ओघात या बाजाराच्या चौकाची दुर्दशा झाल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत होती, यामुळेच आमदारांनी या कामास प्राधान्य देऊन चौक काँक्रीटीकरण साठी 10 लाख निधी आमदार निधीतून दिल्याने ग्रामस्थांनी आमदारांचे आभार व्यक्त केले. यावेळी ग्रामस्थांनी इतर आवश्यक कामांची मागणी केल्याने त्याचीही लवकरच पूर्तता करण्याची ग्वाही आमदारांनी दिली.
यावेळी प.स.सदस्य निवृत्ती बागुल, बाजार समितीचे प्रशासक सदस्य एल.टी.पाटील, रामकृष्ण पाटील , अमळगाव सरपंच रत्नाबाई चौधरी , मिलिंद पाटील, एकनाथ भिल, बन्सीलाल पारधी, विश्वास पाटील, संजय चौधरी, निलेश पाटील, लक्ष्मण पाटील, शिवाजीराव चौधरी (गुरुजी), नामदेव भिल, रोहिदास कोळी, रविंद्र कोळी, गुलाब कोळी, हर्षवर्धन मोरे, प्रविण चौधरी, विलास चौधरी, संजय चौधरी, महेंद्र कुंभार, विक्रम कुंभार, देवीदास कुंभार, नाना कुंभार, बुधा कुंभार, धाकु कुंभार, विजय मोरे, बंडा मोरे यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.