⁠ 
रविवार, जानेवारी 12, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | अमळनेरातून निघाली महिलांची शेगाव वारी, १०० महिलांचा सहभाग

अमळनेरातून निघाली महिलांची शेगाव वारी, १०० महिलांचा सहभाग

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


जळगाव लाईव्ह न्यूज । २६ फेब्रुवारी २०२२ । अमळनेर‎ शहरातील जी.एम.सोनारनगर‎ येथील संत गजानन महाराज‎ संस्थानतर्फे गुरुवारी महिला‎ भाविकांची पायी वारी शेगांवला‎ रवाना झाली.‎ पहाटे ५ वाजता संत गजानन‎ महाराजांची आरती करण्यात आली.‎ नंतर संत गजानन महाराज‎ मंदिरापासून रस्त्यावर महिला‎ भाविकांची वारी निघाली. रस्त्यावर‎ महिलांनी रांगोळी काढून वारीचे‎ स्वागत केले. २४ फेब्रुवारी ते ४‎ मार्चपर्यंत शेगाव वारीचे महिला‎ वारीप्रमुख ज्योती पवार यांनी‎ आयोजन केले आहे.

वाटेत ठिकठिकाणी भाविकांनी वारकऱ्यांसाठी चहा, नाश्ता,‎ भोजन आणि मुक्कामाची‎ व्यवस्था केली आहे. वारीमध्ये‎ अमळनेर, डांगरी, सात्री,‎ भिलाली, सबगव्हाण, कावपिंप्री,‎ खापरखेडा, करणखेडा, मुसळी,‎ धरणगाव येथील १०० महिला‎ भाविक सहभागी झाल्या आहेत.‎

तुळशीपूजा सुवर्णा साळुंखे,‎ विनादारी सरला चव्हाण,‎ प्रा.आर.बी.पवार, वारीप्रमुख‎ ज्योती पवार, वैद्यकीय सेवा‎ डॉ.जिजाबराव पाटील, प्रवीण‎ पवार, हिराबाई पाटील, उर्मिला‎ जगताप, वंदना शिसोदे, श्रीकृष्ण‎ चव्हाण, लहुकांत पाटील, प्रवीण‎ पवार, नितीन भावे, रघुनाथ‎ पाटील सहभागी झाले आहेत.‎


author avatar
टीम जळगाव लाईव्ह