⁠ 
मंगळवार, एप्रिल 30, 2024

कच्चे तेल विक्रमी पातळीवर : जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ फेब्रुवारी २०२२ । रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतींत भडका उडाला आहे. कच्चा तेलाच्या किमती 103 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून आतंरराष्ट्रीय स्थरावर सातत्याने कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत. कच्च्या तेलाच्या किमती वाढत असताना देशातील प्रमुख इंधन पुरवठा कंपन्यांनी पेट्रोल, डिझेलच्या किमतींमध्ये (petrol and diesel price) कोणतीही वाढ केलेली नाही. देशात गेल्या 114 दिवसांपासून पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत.

सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी सकाळी जारी केलेल्या नव्या दरांनुसार, देशात आजही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. आज पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरात कोणताही बदल केला नाही. आज जळगावमध्ये (Jalgaon) एका लिटर पेट्रोलचा दर १११.२९ रुपये इतका आहे. तर डिझेलचा ९४.२० रुपये प्रति लिटर इतका आहे.

येत्या काळात देशात स्थिर असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये मोठी वाढ होऊ शकते, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, आजही देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.

देशात चार महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर काय?
दिल्लीत पेट्रोल 95.41 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर
मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लिटर
चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटर
कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लिटर

हे देखील वाचा :