जळगाव शहरात रोखण्यासाठी मनपा प्रशासनाकडून दररोज कारवाई केली जात आहे. मंगळवारी बागवान मोहल्ला परिसरात विना मास्क असलेल्या नागरिक व हॉकर्सवर कारवाईसाठी गेलेले मनपा उपायुक्त संतोष वाहूळे यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
जळगाव शहरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. प्रशासनाकडून नियमावली आखून देण्यात आलेली असतानाही नागरिकांकडून त्याचे पालन केले जात नाही. शनीपेठ, बळीराम पेठ, सुभाष चौक परिसरात मनपा उपायुक्त संतोष वाहूळे यांच्यासह मनपा अतिक्रमण पथकाकडून कारवाई केली जात आहे.
मंगळवारी उपायुक्त संतोष संतोष वाहूळे सराफ बाजारकडून जोशीपेठकडे जात असताना बागवान गल्लीजवळ काही हॉकर्स व नागरिक त्यांना विना मास्क असल्याचे दिसले. उपायुक्तांनी त्यांना हटकले असता जमाव त्यांच्यावर चालून आला. उपायुक्त वाहनात बसून निघत असताना जमावाने वाहनावर दगडफेक केली.