जळगाव लाईव्ह न्यूज । २५ फेब्रुवारी २०२२ । रशियाने युक्रेनवर (Russia-ukarine) केलेल्या हल्ल्याच्या वृत्तामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी (Gold Price) पाहायला मिळत आहे. अशातच जळगाव सराफ बाजारात सोन्याचे दर विक्रमी पातळी वर जाऊन पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. आज आठवड्याच्या शेवटची दिवशी सोने ११९० रुपयांनी महागले आहे. तर दुसरीकडे चांदीच्या (Silver Price) दरात तब्बल १४८० रुपयाची वाढ झालीय.
आजचा सोने आणि चांदीचा भाव?
आज जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५२,७५० रुपये प्रति तोळा इतका आहे. तर चांदीचा ६७,५८० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते.
गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशात तणाव निर्माण झाला होता. यामुळे जगभरात सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याच्या मागणीत वाढ झाली असल्याचं दिसून आले आहे. मात्र कालपासून या दोन्ही देशात युद्धात सुरू झाल्याने त्याचा थेट परिणाम सोन्याच्या बाजार पेठेवर झाला आहे. काल सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ पाहायला मिळाली. जळगाव सराफ बाजारात गेल्या सलग तिसऱ्या दिवशी सोने महागले आहे. या गेल्या तीन दिवसात सोने १५०० रुपयाची वाढ झाली आहे.
तर दुसरीकडे चांदीच्या दरात देखील मोठी वाढ दिसून आली. चांदीच्या दरात तब्बल २५०० रुपयाची वाढ दिसून आलीय. गेल्या आठवड्यात सोन्याच्या भावात तब्बल १४७० रुपयाची वाढ झाली होती.तर चांदीच्या दरात जवळपास ११०० ते १२०० रुपयाची वाढ झाली होती.
रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढल्यास सोन्याच्या दरात आणखी वाढ होईल, असे मानले जात आहे. सोने लवकरच 60,000 रुपये प्रति 10 ग्रॅमची पातळी गाठू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
या आठवड्यातील दर?
जळगाव सराफ बाजारात सोमवारी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ५१,२९० रुपये इतका होता. त्यानंतर मंगळवारी ५१,२५०, बुधवारी ५१,५१०, गुरुवारी ५१,५६० इतका आहे. तर दुसरीकडे सोमवारी चांदीचा प्रति किलोचा दर ६५,४०० रुपये इतका होता. त्यानंतर मंगळवारी ६५,०८०, बुधवारी ६५,८५०, गुरुवारी ६६,१०० इतका आहे.
सूचना : सदर सोने आणि चांदीने दर हे ऑनलाईन आहे. तरी अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा
हे देखील वाचा :
- साप पकडणे जीवावर बेतले; दंश केल्याने शेतमजुराचा मृत्यू
- विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १०वी आणि १२वी परीक्षेच्या तारखा जाहीर
- राष्ट्रीय युवा महोत्सव अंतर्गत ‘भारत यंग लीडर्स डायलॉग’ चर्चासत्रात भाग घेण्यासाठी तरुणांना आवाहन
- मुक्ताईनगरमध्ये लागणार धक्कादायक निकाल; संभाव्य आमदार कोण? पाहा..
- उमेदवारांनो मुंबई गाठा! निकलाआधी शरद पवारांच्या महत्त्वाच्या सूचना, वाचा काय आहेत?