⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | वाणिज्य | SBI की पोस्ट ऑफिस? कोण देणार FD ला सर्वाधिक रिटर्न्स, जाणून घ्या..

SBI की पोस्ट ऑफिस? कोण देणार FD ला सर्वाधिक रिटर्न्स, जाणून घ्या..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२२ । बाजारात अनेक प्रकारच्या गुंतवणूक योजना उपलब्ध आहेत, ज्यामध्ये परतावा चांगला असतो पण जोखीमही तितकीच जास्त असते. तथापि, गुंतवणुकीसाठी एफडी (Fixed Deposit) सर्वात सुरक्षित मानली जाते. यामुळे कोणताही धोका पत्करत नसलेल्या लोकांचा विश्वास आजही एफडीवर कायम आहे.

देशातील अनेक लहान, मोठ्या, खाजगी आणि सरकारी बँका एफडी करण्याची सुविधा देतात. याशिवाय, पोस्ट ऑफिस म्हणजेच पोस्ट ऑफिस फिक्स डिपॉझिट योजनेची सुविधा देखील प्रदान करते. जे लोकांना खूप आवडते. चला तर मग जाणून घेऊया तुम्हाला बँक किंवा पोस्ट ऑफिसमधून जास्त फायदा कुठे मिळेल?

सर्वप्रथम SBI मधील मुदत ठेवीबद्दल जाणून घेऊया..
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) गुंतवणुकीच्या आवश्यकतेनुसार 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या कालावधीसह FD दर ऑफर करत आहे. SBI FD व्याजदर सामान्य ग्राहकांसाठी 2.9% ते 5.5% दरम्यान आहेत. या ठेवींवर SBI ज्येष्ठ नागरिकांना 50 bps अधिक देते.

SBI मधील FD वर किती व्याजदर आहेत ते जाणून घ्या (₹ 2 कोटी पेक्षा कमी)
७ दिवस ते ४५ दिवस – २.९%
४६ दिवस ते १७९ दिवस – ३.९%
180 दिवस ते 210 दिवस – 4.4%
211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी – 4.4%
1 वर्ष ते 2 वर्षांपेक्षा कमी – 5.1%
2 वर्षे ते 3 वर्षांपेक्षा कमी – 5.2%
3 वर्षे ते 5 वर्षांपेक्षा कमी – 5.45%
5 वर्षे आणि 10 वर्षांपर्यंत – 5.5%

पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना:
दुसरीकडे, जर आपण पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनेबद्दल बोललो, तर ते एक वर्ष ते पाच वर्षांच्या कालावधीसाठी एफडी देतात. बँक एफडी प्रमाणे, गुंतवणूकदार पोस्ट ऑफिस मुदत ठेवीच्या कालावधीत हमी परतावा मिळवू शकतात.

पोस्ट ऑफिसमध्ये एफडीवर किती व्याजदर आहेत
1 वर्ष – 5.5%
2 वर्षे – 5.5%
३ वर्षे – ५.५%
5 वर्षे – 6.7%

हे देखील वाचा :

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.