⁠ 
रविवार, जानेवारी 12, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | गजानन परिवारातर्फे संत गजानन महाराज प्रकट दिन साजरा

गजानन परिवारातर्फे संत गजानन महाराज प्रकट दिन साजरा

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२२ । अमळनेर येथे शेगांव निवासी श्री. संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त येथील साई गजानन परिवारातर्फे उत्सव साजरा करण्यात आला.

श्री.साई गजानन परिवारातर्फे दर वर्षीप्रमाणे यंदाही श्री संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा बुधवार रोजी साजरा केला. यावेळी सकाळी 7:00 वाजता गजानन विजय ग्रंथाचे सामुहिक पारायण करण्यात आले. 8:30 वाजता वाद्यच्या गजरात पालखी मिरवणूक डहाले’च्या घरुन निघाली. बहुसंख्य गजानन भक्त मिरवणूकीत सहभागी झाले. पालखी ऍड. गजानन विन्चुरकर यांच्या घरी पुजा होऊन सुरेश पाटील यांच्याकडून देशमुखाकडे महाआरती करण्यात आली. त्यानंतर योगेश मुकुंद बाग यांच्या निवासस्थानी माऊलीची आरती करून भेट करण्यात आली. कचेरी समोरून पालखी मिरवणूक गजानन हॉलला नेण्यात आली. दरम्यान, जि.प.सदस्या जयश्री यांनी भेट दिली. गजानन परिवारचे अध्यक्ष पाटील व विठ्ठल पाटील यांनी जयश्री यांचे सत्कार केला. तसेच माजी नगर सेवक विनोद कदम, समाज सेवक दीपक पाटील, प्रवीण दत्तात्रेय सनेर, संदीप पाटील व रंजना देशमुख यांचाही सत्कार करण्यात आला. सकाळी 11:00 वाजता सत्संग कार्यक्रमास सड़ावन, चाकवे, नेरपाट येथील गजानन भक्तानी सत्संगात गजानन महाराजांचे भजने, गवळणी, गायन करण्यात आले. दुपारी 12:00 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी जगतगुरु गुरुवर्य बहुउद्धेशिय सेवा मंडलाचे शिवाजी पाटील, गुणवंत पवार, एस सोनवणे, ए पाटील , जितेंद्र बोरसे, विठ्ठल पाटील, गणेश बोढरे, रमेश पाटील, डी पाटील, नामदेव महारु पाटील, गुलाब पाटील, योगेश पाटील, योगेश बाग, मुकेश सालुंखे, सुनील मुंडले, निळ दादा, राजेंद्रसिंग पाटील, सुनीता पाटील, ललिता पाटील,चंद्रशेखर वैद्य, छाया इसे , राजेंद्र सोनवणे, दिलीप सोनवणे, योगिता डहाळे, वाल्मिक मराठे, शिरीष डहाळे, अशोक इसे, गायत्री ताई, सैंदाने, संदीप पाटील यांनी परिश्रम घेतले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह