⁠ 
रविवार, जानेवारी 12, 2025
Home | जळगाव जिल्हा | अमळनेर | राजमुद्रा फाउंडेशनतर्फे विविध उपक्रमांनी भव्य दिव्य शिवजयंती साजरी

राजमुद्रा फाउंडेशनतर्फे विविध उपक्रमांनी भव्य दिव्य शिवजयंती साजरी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ फेब्रुवारी २०२२ । अमळनेर येथे राजमुद्रा फाउंडेशनतर्फे महिला, विद्यार्थी यांच्यासाठी तीन दिवसीय वेगवेगकळे उपक्रम राबवत शिवजयंती साजरी करण्यात आली.

कोरोनाचे बंधन असल्याने मागील २ वर्षांपासून शिवजन्मोत्सव साजरा करण्याला मर्यादा होत्या, मात्र या वर्षी निर्बंध शिथिल झाल्याने शहरातील ढेकू रोड-पिंपळे रोड भागातील नामांकित अशा राजमुद्रा फाउंडेशनतर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करत शिवजन्मोत्सव ३ दिवस साजरा करण्यात आला. १७ फेब्रुवारी रोजी परिसरातील महिला एकत्र याव्यात, त्यांच्यात सुसंवाद निर्माण व्हावा, यासाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात परिसरातील असंख्य महिलांनी सहभाग नोंदवला. तर १८ फेब्रुवारी रोजी नगरपालिका व राजमुद्रा फाउंडेशन’च्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिवरायांच्या विषयावर आधारित चित्रकला तसेच रंगभरण स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यात ११०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. १९ फेब्रुवारी शिवजयंती रोजी ढेकू रोड भागातील न्यू पटवारी कॉलनी येथे भव्य दिव्य असा किल्याचा सेट उभारून त्यावर शिवरायांची मूर्ती ठेवण्यात आलेली होती, कोरोनामुळे मिरवणूक न काढता जागेवरच पूजन करण्यात आले.

यावेळी आमदार अनिल पाटील, माजी आमदार कृषिभूषण पाटील, बाजार समितीच्या मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील, ऍड.ललिता पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ, ग्राम विकास शिक्षण संस्थेचे चेअरमन जयवन्त आबा, पोलीस उपविभागीय अधिकारी राकेश जाधव, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, आरोग्य सभापती श्याम पाटील उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, अजिंक्य स्पोर्ट्स असोसिएशन, महाराणी येसूबाई महिला बचत गट, स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह