जळगाव शहर

फटाक्याच्या ठिणगीने केला घात, लग्न मंडपाबाहेर दुचाकी जळाली

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ फेब्रुवारी २०२२ । शहरातील प्रभात चौकाजवळ असलेल्या एका लग्न समारंभ मंडपाच्या बाहेर फटाक्यांची लड उडवल्याने त्यातून उडालेल्या ठिणगीमुळे एका वर्‍हाडीची दुचाकीने पेट घेतल्याची घटना मंगळवारी दुपारी ४.१५ च्या सुमारास घडली. दरम्यान, उपस्थितांनी राखलेल्या समयसूचकतेने दहा मिनीटात ही आग आटोक्यात आली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

मंगळवारी प्रभात चौकाजवळील रस्त्यावर नेमाडे व इंगळे परिवाराचा लग्न संभारंभ होता. लग्न लागल्यानंतर काही तरुणांनी मंडपाच्या बाहेर उभ्या केलेल्या वाहनांजवळच फटाक्याची लड पेटवली. त्यामुळे उडालेल्या एका ठिणगीने लग्नात हजर असलेले वऱ्हाडी स्वप्नील सुभाष पाटील (रा. भुसावळ) यांची दुचाकी क्रमांक एमएच.१९.सीक्यू.२८३७ ने अचानक पेट घेतला. पेट घेताच आगीचे लोळ उठले होते. शेजारी इतर देखील वाहने असल्याने ती ती वाहने देखील पेटण्याची शक्यता होती.

जवळच असलेल्या एका तरुणाने प्रसंगावधान दाखवीत दुचाकीस लाथ मारुन मोकळ्या जागी ढकलले. यानंतर नागरिकांनी दुचाकीवर माती, पाणी मारले. शेजारच्या अपार्टमेंटमधील एका दाम्पत्याने दुसर्‍या मजल्यावरुन नळीने पाणी मारले. दहा मिनीटात ही आग आटोक्यात आली. पाटील यांनी लग्नासाठी येत असताना दुचाकीची पुर्ण टाकी पेट्रोल भरली होती. त्यामुळे आगीचा भडका मोठा झाला होता. तसेच शेजारी असलेली वाहने देखील पेटण्याची शक्यता होती. दुचाकीने पेट घेताच इतर वाहनधारकांची चांगलीच धावपळ उडाली. आग लवकर आटोक्यात आल्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button