जळगाव लाईव्ह न्यूज । २३ फेब्रुवारी २०२२ । रशिया-युक्रेनमधील(Russia and Ukraine) वादाचा फटका हा जागतिक बाजारपेठेला बसताना दिसत असून यामुळे सोन्या-चांदी (Gold-Silver) सारख्या मौल्यवान धातुचे भाव देखील प्रभावित झाले आहेत. जळगाव सुवर्ण नगरीत गेल्या दोन दिवसाच्या सोने दरातील घसरणीला आज ब्रेक लागला आहे. आज सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या भावात देखील वाढ झालीय. आज बुधवारी १० ग्रॅम सोन्याच्या भावात २६० रुपयाची वाढ झाली आहे. तर चांदी ७७० रुपये प्रति किलोने महागली आहे. त्यापूर्वी काल सोने ४० रुपयाने तर चांदी ३२० रुपयाने स्वस्त झाली होती.
आजचा सोने आणि चांदीचा भाव?
आज जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५१,५१० रुपये प्रति तोळा इतका आहे. तर चांदीचा ६५,८५० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते. दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ दिसून येते.
जळगाव सराफ बाजारात गेल्या दोन दिवसापासून सोन्याच्या दरात घसरण दिसून आली. या दोन दिवसात सोन्याच्या दरात ३२० रुपयाची घट झाली होती. परंतु काल रशिया-युक्रेन संघर्ष चिघळण्यानंतर गुंतवणूकदार धास्तावले आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने खरेदीला (Gold) प्राधान्य देत आहे. दरम्यान सध्या लग्नसराईचा हंगाम असल्याने सोने, चांदीच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्याचा परिणाम देखील सोने चांदीच्या किमतीवर होताना दिसून येत आहे. मागणी वाढल्याने भाव वधारले आहेत.
या आठवड्यातील दर?
जळगाव सराफ बाजारात सोमवारी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ५१,२९० रुपये इतका होता. त्यानंतर मंगळवारी ५१,२५० तर आज बुधवारी ५१,५१० इतका आहे. तर दुसरीकडे सोमवारी चांदीचा प्रति किलोचा दर ६५,४०० रुपये इतका होता. त्यानंतर मंगळवारी ६५,०८० तर आज बुधवारी ६५,८५० इतका आहे.
सूचना : सदर सोने आणि चांदीने दर हे ऑनलाईन आहे. तरी अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा
हे देखील वाचा :
- साप पकडणे जीवावर बेतले; दंश केल्याने शेतमजुराचा मृत्यू
- विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १०वी आणि १२वी परीक्षेच्या तारखा जाहीर
- राष्ट्रीय युवा महोत्सव अंतर्गत ‘भारत यंग लीडर्स डायलॉग’ चर्चासत्रात भाग घेण्यासाठी तरुणांना आवाहन
- मुक्ताईनगरमध्ये लागणार धक्कादायक निकाल; संभाव्य आमदार कोण? पाहा..
- उमेदवारांनो मुंबई गाठा! निकलाआधी शरद पवारांच्या महत्त्वाच्या सूचना, वाचा काय आहेत?