जळगाव लाईव्ह न्यूज । २२ फेब्रुवारी २०२२ । अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील विविध कार्यकारी विकास सोसायटीची निवडणूक नुकतीच पार पडली. यात परिवर्तन पॅनलने वर्चस्व राखले असून त्यांनी ७ जागांवर तर बहुजन शेतकरी पॅनलने ६ जागांवर विजय मिळवला. दरम्यान, साेसायटीच्या चेअरमनपदी सुनील पवार तर व्हॉइस चेअरमनपदी जगन्नाथ सोनवणे यांची निवड झाली आहे.
पाताेंडा येथील विकास साेसायटीची निवडणूक झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी शुक्रवारी चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाची निवडणूक घोषीत केली होती. यावेळी चेअरमन व व्हाॅइस चेअरमन पदासाठी बहुजन शेतकरी पॅनलतर्फे किशोर मोरे, राहुल लाबोळे यांनी ही अर्ज सादर केला होता. मतदान प्रकियेत सुनील पवार व जगन्नाथ सोनवणे यांना ७ मते मिळाली तर किशोर मोरे, राहुल लांबोळे यांना ६ मते मिळाली. निवडणूक निर्णय अधिकारी विवेक जगताप यांनी चेअरमन पदासाठी सुनील पवार तर व्हॉइस चेअरमन म्हणून जगन्नाथ सोनवणे यांचे नाव घोषित केले. त्यांना सेक्रेटरी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. यावेळी दोन्ही पॅनलचे सदस्य उपस्थित होते. निकाल जाहीर होताच परिवर्तनतर्फे जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी पॅनलचे प्रकाशक जितेंद्र पवार, निवृत्त मुख्याध्यापक जयवंतराव पवार, सुकलाल बोरसे, मोरेश्वर पवार, रघुनाथ चौधरी, गजानन पाटील, मेघनाथ सूर्यवंशी, अशोक पवार, दिलीप पाटील, विठ्ठल बोरसे, सुनील चौधरी, हिरामण माळी, विनोद पवार हजर हाेते.
- ऑनलाइन फसवणूक थांबेना! जळगावच्या डॉक्टरला तब्बल 3156000 रुपयात गंडविले..
- मामाकडे राहणाऱ्या तरुणाने उचललं धक्कादायक पाऊल ; जळगावातील घटना
- ते आज पप्पी घेताय..; मंत्री गुलाबराव पाटीलांचा उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
- ग्राहकांचे दिवाळ निघणार! जळगाव सुवर्णपेठेत सलग चौथ्या दिवशी सोने महागले, चांदीही वधारली
- Jalgaon : तरुणाच्या खात्यातून एक लाख गायब; सायबर ठगांनी अशी केली फसवणूक?