जळगाव शहर

नशिराबाद येथे राष्ट्रवादीतर्फे 2200 जणांना रेशन कार्ड वाटप

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ फेब्रुवारी २०२२ । जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे व गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयाच्या सौजन्याने 2200 जणांना रेशन कार्ड वाटपाचा कार्यक्रम नुकताच झाला. माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे व जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते नागरिकांना रेशन कार्ड देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज महाजन यांच्या प्रयत्नांनी नागरिकांना हे रेशन कार्ड वाटप करण्यात आले.

जिल्ह्यात अनेक नागरिकांना रेशन कार्डसाठी तहसील कचेरीच्या फेऱ्या माराव्या लागतात. कधीकधी दलालांकडून त्यांची आर्थिक लूट होते. ही सर्व परिस्थिती पाहता पंकज महाजन यांनी नशिराबादच्या नागरिकांची ही समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला. यामुळे आज नागरिकांना घरबसल्या रेशन कार्ड मिळत आहे. तसेच गावातील अनेक विकासकामांचा त्यांनी पाठपुरावा करून ही कामे तडीस नेली आहेत, असे गौरवोद्गार श्री खडसे व श्री देवकर यांनी कार्यक्रम प्रसंगी काढले. आपल्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात महाजन यांनी अनेक विकासाची कामे पाठपुरवठा करून आपल्याकडून करून घेतली, याची आठवणही श्री देवकर यांनी करून दिली.

यांची होती उपस्थिती

कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड रवींद्र भैय्या पाटील, प्रदेश अल्पसंख्यांक सेलचे एजाज मलिक, राष्ट्रवादी सहकार विभागाचे जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील, योगेश देसले, विलास पाटील, अशोक लाडवंजारी, उमेश नेमाडे, बापू परदेशी, लीना महाजन, पंकज महाजन, सय्यद बरकत अली, चंद्रकांत पाटील, सांडू पैलवान, निलेश रोटे, आयुब मेंबर, चांद मेंबर, नजीर अली सय्यद, मुस्ताक मिस्त्री आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button