⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | गोदावरी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा व प्राध्यापकांचा सुसंवाद उत्साहात

गोदावरी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा व प्राध्यापकांचा सुसंवाद उत्साहात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ फेब्रुवारी २०२२ । गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा संस्थेतील प्राध्यापकांशी सुसंवाद निर्माण व्हावा व त्यांना शैक्षणिक वातावरणाशी जुळवुन घेता यावे, या हेतुने १५ व १६ फेब्रुवारीला इंडक्शन प्रोगाम आयोजित करण्यात आला होता. फाऊंडेशनच्या सदस्या डॉ. केतकी पाटील, डीएम कार्डियोलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, रजिस्ट्रार प्रमोद भिरुड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थीत होते.

मान्यवरांच्याहस्ते दिपप्रज्वलन व सरस्वती पुजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयात असलेल्या सर्व शाखाप्रमुखांची ओळख विद्यार्थी व पालक वर्ग यांनी देण्यात आली. यामुळे परस्परांशी संबध जोपासले जातील. प्रास्ताविकात प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांनी संस्थेत असलेल्या सोयीसुविधा अभियांत्रिकीच्या विविध शाखा त्यांचे परस्पर संबध व्यक्तिमत्व विकास यांची माहिती दिली. तसेच करिअरच्या सुवर्णसंधी या महत्वाच्या विषयावर त्यांनी प्रकाश टाकतांना नवनविन क्षेत्रामध्ये तुम्ही कसे करिअर करु शकतात व त्यासाठी महाविद्यालयात राबविण्यात येणारे विविध उपक्रमावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.वैभव पाटील यांनी महाविद्यालयातील उपक्रमांचे कौतुक केले. डॉ.केतकी पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना देण्यासाठी महाविद्यालया मध्ये राबविण्यात येणारे कार्यक्रम व उपक्रम यांच्या बद्दल समाधान व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांनी अशा कार्यक्रमामध्ये हिरीरीने सहभागी व्हावे, असे आवाहन केले. पालकांनीही कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्‍त केले.

कार्यक्रमाच्या द्वितीय सत्रात प्रा.निलेश चौधरी यांनी परिक्षेचा पॅटर्न आणि विद्यापीठाच्या नियमाबद्दल सविस्तर माहिती दिली. जीएमआयरआरचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी जागतिक स्तरावर असलेल्या अभियांत्रिकीच्या संधी व त्याचे रुपांतर करीयर मध्ये कसे करावे याबद्दल अतिशय रंजक पद्धतीने समजावून सांगितले. प्रा. निलेश वाणी यांनी विद्यार्थ्यांना ऑन लाईन कोर्सची सविस्तर माहिती दिली.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रथम वर्ष विभागचे डॉ. सरोज भोळे, प्रा.ललीता पाटील, प्रा.संजय चौधरी, प्रा.वृषाली शिपी यांनी परिश्रम घेतले. तसेच कार्यक्रमासाठी डॉ.नितीन भोळे (विभाग प्रमुख), प्रा.हेमंत इंगळे (अ‍ॅकेडेमीक डीन), प्रा.प्रविण फालक (उप प्राचार्य) व डॉ.विजयकुमार (प्राचार्य) यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.दिपाली पाटील व प्रा.ज्ञानदा कोल्हे यांनी केले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह